विजेंदर, शिव थापा, पिंकी, पूजा भारतीय संघात

By admin | Published: July 20, 2014 12:50 AM2014-07-20T00:50:56+5:302014-07-20T00:50:56+5:30

ग्लास्गो येथे होणा:या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात अव्वल मुष्टियुद्धपटू विजेंदर सिंह, शिव थापा, पिंकी जांग्रा आणि पूजा राणी यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

Vijender, Shiv Thapa, Pinky, Pooja in the Indian squad | विजेंदर, शिव थापा, पिंकी, पूजा भारतीय संघात

विजेंदर, शिव थापा, पिंकी, पूजा भारतीय संघात

Next
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा :  भारतीय ध्वजाखाली खेळण्याची परवानगी 
नवी दिल्ली : ग्लास्गो येथे होणा:या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात अव्वल मुष्टियुद्धपटू विजेंदर सिंह, शिव थापा, पिंकी जांग्रा आणि पूजा राणी यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.  आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महासंघाने नेमलेल्या बॉक्सिंग इंडियाच्या निवड समितीने संघ घोषित केला. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय मुष्टियुद्ध संघाला आपल्या देशाचा तिरंगा फडकाविण्याची, ट्रॅकसुटवर तिरंगा लोगो वापरण्याची परवानगी दिली आहे. जर कोणत्याही मुष्टियुद्धपटूने पदक जिंकले, तर भारताचे राष्ट्रगीतसुद्धा वाजविले जाणार आहे. 
 
संघ पुढील प्रमाणो : 
पुरुष : 49 किलो गट ; एल. देवेंद्रो, 56 किलो : शिव थापा, 64 किलो : मनोज मुमार, 69 किलो : मनदीप जांग्रा, 75 किलो : विजेंदर सिंह, 81 किलो : सुमित संगवाण, 91 किलो : अमरीतप्रीत सिंह, 91 किलो वरील गट : प्रवीण कुमार ; मुख्य मार्गदर्शक : जी. एस. संधू; क्यूबा मार्गदर्शक : बी. आय. फर्नाडिस; महिला : 51 किलो : पिंकी जांग्रा, 6क् किलो, 75 किलो : पूजा राणी; मार्गदर्शक : हेमलता. 
विदेशी मार्गदर्शक : रोमेन रोमेरो डेर्के.

 

Web Title: Vijender, Shiv Thapa, Pinky, Pooja in the Indian squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.