पाटणे येथील व्याख्यान मालेला ग्रामस्थांनी दिला उत्तम प्रतिसाद
By admin | Published: December 25, 2014 10:41 PM2014-12-25T22:41:02+5:302014-12-25T22:41:02+5:30
देवळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायत्ता कक्ष आणि कर्मवीर रामरावजी आहेर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ पाटणे (मालेगाव) येथील श्रीरामतील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक सागता करण्यात आली. १८ ते २० डिसेंबर या दरम्यान व्याख्यानमालेची सुरुवात झाली.
Next
द वळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायत्ता कक्ष आणि कर्मवीर रामरावजी आहेर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ पाटणे (मालेगाव) येथील श्रीरामतील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक सागता करण्यात आली. १८ ते २० डिसेंबर या दरम्यान व्याख्यानमालेची सुरुवात झाली.व्याख्यानमालेचे उद्घाटन पाटणे येथील सरपंच मनिषा अहिरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भिला खैरनार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आले.प्रास्ताविकात प्रा.डॉ. जयवंत भदाणे यांनी पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचा इतिहास आणि बहि:शाल शिक्षण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिक सहायत्ता कक्षाच्या उपक्रमांचे महत्व सांगितले.प्रथम पुष्प राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक दादाजी ठाकूर यांनी भगवद्गीता व उपनिषदे या विषयावरील व्याख्यानाद्वारे गुंफणे आपल्या वाट्याला आलेले काम श्रद्धेने, निष्ठेने, प्रामाणिकपणाने आणि फायद्यातोट्याचा विचार न करता केले पाहिजे हा खरा कर्मयोग असल्याचे ते म्हणाले.संत गाडगेबाबा यांच्या ग्रामस्वच्छतेचा मंत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल उपस्थितांना मनिषा अहिरे यांनी दुसरे पुष्प श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र नाशिकचे सुभाष खर्डेकर यांनी ज्येष्ठांसाठी सूर्यनमस्कार या विषयावर गुंफले. सूर्यनमस्कार व प्राणायाम यातून मन मनगट व बुद्धीचा सर्वांगीण विकास करण्याविषयीचे मार्गदर्शन त्यांनी प्रात्यशिकासह केले. अध्यक्षस्थानी मालेगाव पंचायत समितीच्या सदस्य सौ. अरुणा बागुल होत्या.व्याख्यानमालेल्या समारोपाच्या सत्रात महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्यवाह एस.बी. मुलाणी यांनी ज्येष्ठांचे कौटुंबिक व सामाजिक जीवन या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पाटणे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बागुल होते.