कोच आणि सपोर्ट स्टाफमुळे विनेशचे वजन वाढले? WFI अध्यक्षांनी केली कारवाईची मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 08:07 PM2024-08-07T20:07:41+5:302024-08-07T20:08:11+5:30

विनेश फोगाटच्या अपात्रतेवर भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Vinesh Phogat: Did Vinesh gain weight due to coaches and support staff? WFI president demands action | कोच आणि सपोर्ट स्टाफमुळे विनेशचे वजन वाढले? WFI अध्यक्षांनी केली कारवाईची मागणी...

कोच आणि सपोर्ट स्टाफमुळे विनेशचे वजन वाढले? WFI अध्यक्षांनी केली कारवाईची मागणी...

Vinesh Phogat Disqualification Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सुवर्णपदकाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) वजन वाढल्याचे कारण देत स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. आता विनेशच्या अपात्रतेचा मुद्दा तापत चालला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय दलाचे प्रमुख गगन नारंग लवकरच युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ला भेटू शकतात. दरम्या, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष संजय सिंह यांनी विनेश फोगटचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. 

डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष संजय सिंग म्हणाले की, विनेशच्या अपात्रतेबाबत आम्ही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) आणि UWW अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मला सांगण्यात आले की, विनेशचे वजन निर्धारित मानकांपेक्षा 100 ग्रॅम जास्त भरले. मी अधिकाऱ्यांना विनेशला सूट देण्याची विनंती केली, पण त्यांनी ती नाकारली. संपूर्ण देशाला गोल्ड मेडलची अपेक्षा होती, पण विनेश वजनामुळे बाहेर पडली. विनेशला या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. संपूर्ण देश तिच्या पाठीशी आहे."

प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफवर आरोप
संजय सिंह विनेशचे कोच आणि सपोर्ट स्टाफवर आरोप केला आहे. विनेशचे वजन 50 किलोच्या आत राहावे, ही जबाबदारी तिच्या प्रशिक्षकाची होती. या प्रकरणात विनेशचा कोणताही दोष नाही. यासाठी तिचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला जबाबदार आहेत. विनेशचे वजन अचानक कसे वाढले, याची चौकशी व्हायला हवे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणीही केली आहे.

पीएम मोदींनी दिला धीर
विनेशवर झालेल्या अपात्रतेच्या कारवाईनंतर पीएम मोदींनी तिच्यासाठी ट्विट केले. ते म्हणाले, "विनेश, तू मोठी चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणा आहात. आजचा भारताला बसलेला धक्का दु:खदायक आहे. मला झालेले दु:ख मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या निर्णयाने साऱ्यांनाच प्रचंड निराशा झाली आहे. पण, मला माहित आहे की तू फायटर आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. दमदार पुनरागमन कर! आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत," असे धीर देणारे ट्विट मोदींनी केले.

Web Title: Vinesh Phogat: Did Vinesh gain weight due to coaches and support staff? WFI president demands action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.