विनेश फोगाटच्या सहकारी खेळाडूची 'गोल्डन' कामगिरी; अखेर तिच्या गावात 'सुवर्ण पदक' आलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 05:00 PM2024-08-23T17:00:20+5:302024-08-23T17:07:25+5:30

neha sangwan gold medalist : नेहा सांगवानने सोनेरी कामगिरी केली.

Vinesh Phogat's teammate Neha Sangwan, a female wrestler, won a gold medal at the Under-17 World Championships | विनेश फोगाटच्या सहकारी खेळाडूची 'गोल्डन' कामगिरी; अखेर तिच्या गावात 'सुवर्ण पदक' आलं!

विनेश फोगाटच्या सहकारी खेळाडूची 'गोल्डन' कामगिरी; अखेर तिच्या गावात 'सुवर्ण पदक' आलं!

vinesh phogat village balali : ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला एकही सुवर्ण पदक जिंकता आले नाही. खरे तर विनेश फोगाटच्या रूपात भारतीय शिलेदार गोल्डन कामगिरी करेल या आशेवर तमाम भारतीय ऑलिम्पिक पाहत होते. पण, अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला पदकानेच नाही तर नशिबाने देखील हुलकावणी दिली. फायनलच्या लढतीआधी तिचे १०० ग्रॅम वजन वाढल्याने भारताच्या हक्काचे पदक गेले. तिला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले पण तिथेही भारताला मोठा धक्का बसला. विनेशला खाली हात मायदेशात परतावे लागले. मात्र, तिने केलेल्या गोल्डन कामगिरीने तमाम देशवासियांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. 

दरम्यान, रौप्य पदक देण्याची विनेशची मागणीही फेटाळण्यात आली. त्यामुळे विनेशला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. आता विनेशची सहकारी खेळाडू नेहा सांगवानने सुवर्ण कामगिरी केली. आपल्या लेकीला स्पर्धेबाहेर व्हावे लागल्याने विनेशच्या बलाली गावात एकच शांतता पसरली होती. मात्र, आता १६ वर्षाच्या कुस्तीपटूने बलाली ग्रामस्थांना खुशखबर दिली. 

नेहा सांगवानची सोनेरी कामगिरी 
बलालीच्या नेहा सांगवानने १७ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. नेहाचा हा विजय विनेश आणि तिच्या गावातील लोकांच्या जखमा भरून काढू शकत नसला तरी त्यांना नक्कीच काहीसा दिलासा देऊ शकतो. कारण विनेशचीही तिच्या गावातील आणखी कुस्तीपटूंनी देशाचा गौरव करावा अशी इच्छा होती. नेहाने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या सो सुसाईचा १०-० असा दारुण पराभव केला. नेहाने हा विजय विनेशला समर्पित केला.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. 

Web Title: Vinesh Phogat's teammate Neha Sangwan, a female wrestler, won a gold medal at the Under-17 World Championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.