विनोद राय बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

By admin | Published: January 30, 2017 04:11 PM2017-01-30T16:11:34+5:302017-01-30T16:55:22+5:30

अनुराग ठाकुर यांची हकाटपट्टी केल्यापासून रिक्त असलेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर माजी कॅग विनोद राय यांची

Vinod Roy BCCI new chairman | विनोद राय बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

विनोद राय बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

Next
ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 30 - अनुराग ठाकुर यांची हकाटपट्टी केल्यापासून रिक्त असलेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आज माजी कॅग विनोद राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राय यांची नियुक्ती केली असून, इतिहासकार रामचंद्र गुहा आणि विक्रम लिमये यांची प्रशासकीय पॅनलवर नियुक्ती करण्यात आली आहे. माजी महिला क्रिकेटपटू डायना एडलजी यांनाही प्रशासकीय पॅनलमध्ये स्थान देण्यात आले आहे. मात्र बीसीसीआयमधील नियुक्त्या करताना क्रीडामंत्रालयाच्या सचिवांना प्रशासकीय पॅनलमध्ये स्थान देण्याची केंद्र सरकारने केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. 
याआधी 24 जानेवारी रोजी या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान बीसीसीआयने सुचवलेली सर्व 9 नावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. दरम्यान, आजच्या सुनावणीमध्ये बीसीसीआय अध्यक्ष आणि प्रशासकीय समितीची निवड करतानाच सर्वोच्च न्यायालयाने पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत संघटनेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रतिनिधींचीही निवड केली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी आणि विक्रम लिमये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील. 
( ठाकूर तो गयो ! अनुराग ठाकूर बीसीसीआयमधून आऊट )
न्यायमूर्ती लोढा समितीने संघटनेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत वारंवार चालढकल केल्याने संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटवले होते. 

Web Title: Vinod Roy BCCI new chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.