Beijing Winter Olympics 2022: चीन सुधारणार नाही! Live TV वर केली 'गुंडगिरी', ऑलिम्पिक कव्हरेज करणाऱ्या पत्रकाराला ओढलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 07:05 PM2022-02-05T19:05:04+5:302022-02-05T19:06:31+5:30
ऑलिम्पिक स्पर्धांचे कव्हरेज करण्यासाठी पत्रकार रस्त्यावर उभा असतानाच चिनी सुरक्षारक्षकाने त्याच्याशी गुंडगिरी केली.
Beijing Winter Olympics 2022: बीजिंग हिवाळी ऑलिंपिक २०२२ ला शनिवारी सुरुवात झाली. खेळांना नीट सुरूवात झाली. पण चिनने साऱ्या जगासमोर Live TV वर हे सिद्ध केलं की क्रीडा स्पर्धांदरम्यान देखील पत्रकारांच्या हक्कावर आणि स्वातंत्र्यावर गदा आणण्यात ते अजिबात मागे पुढे पाहत नाहीत. नेदरलँडचा एका पत्रकार वार्तांकन करत असताना Live TV वर त्याच्याशी चीनी अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याची घटना घडली. डच ब्रॉडकास्टर NOS च्या व्हिडिओ क्लिपमध्ये, बीजिंग गेम्स कव्हर करणाऱ्या पत्रकाराला सुरक्षा रक्षकांनी ओढलं आणि थेट बाजूला नेलं.
Onze correspondent @sjoerddendaas werd om 12.00u live in het NOS Journaal door beveiligers voor de camera weggetrokken. Helaas is dit steeds vaker de dagelijkse realiteit voor journalisten in China. Hij is in orde en kon zijn verhaal gelukkig een paar minuten later afmaken pic.twitter.com/GLTZRlZV96
— NOS (@NOS) February 4, 2022
डच रिपोर्टर शुअर्ड डेन दास यांच्याबरोबर ही घटना घडली. या घटनेदरम्यान आपला कार्यक्रम सुरू ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण घडलेला प्रकार पाहून NOS चे स्टुडिओ प्रसारण कट करण्यात आले. डेली बीस्टच्या मते, रिपोर्टर ज्या जागेवरून कव्हरेज करत होता ते योग्य नसल्याने त्याला हटवण्यात आले. डॅन दास फॅशनेबल बर्ड्स नेस्ट स्टेडियमऐवजी खराब प्रकाश असलेल्या रस्त्यावर शूटिंग करत असल्याचं कारण देण्यात आलं.
NOS ने ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं की आमचे वार्ताहर डॅन दास यांना दुपारी १२ वाजता सुरक्षा रक्षकांनी कॅमेरापासून दूर खेचले. दुर्दैवाने, चीनमधील पत्रकारांसाठी हे रोजचंच आहे. चांगली बाब म्हणजे डॅन दास ठीक आहे. पण तो काही मिनिटे बोलल्यानंतर त्याला त्याचं रिपोर्टिंग पूर्ण करता आलं नाही याबद्दल खेद व्यक्त करतो.