Neeraj Chopra : आकाश, जमीन असो किंवा पाणी, नेहमी भालाफेकीचा विचार!, नीरज चोप्राचा 'अंडरवॉटर' भालाफेकीचा सराव, Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 12:01 AM2021-10-03T00:01:57+5:302021-10-03T00:10:52+5:30
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणारा नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) सध्या सुट्टीसाठी मालदिव येथे गेला आहे.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणारा नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) सध्या सुट्टीसाठी मालदिव येथे गेला आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं मालदीवचे फोटो पोस्ट केले होते. सुट्टीवर असतानाही नीरजच्या ध्यानीमनी भालाफेकीच आहे. त्यानं मालदीव येथे अंडरवॉटर डायव्हिंग करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यातही पाण्याच्या खाली भालाफेकीचाच सराव करताना दिसत आहे. त्या व्हिडीओवर त्यानं कमेंटही पोस्ट केलीय, त्यानं लिहिलं की, आकाश असो, जमीन असो किंवा पाणी... मी नेहमीच भालाफेकीचा विचार करतो. ट्रेनिंग सुरू झाली आहे.''
Alarms off, vacation mode on. 😉 #Maldivespic.twitter.com/1coTi50GyK
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) September 29, 2021
भारताच्या नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत इतिहास घडवला. भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील १२५ वर्षांतील हे अॅथलेटिक्समधील पहिलेच पदक ठरले. २००८नंतर पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रगीत वाजले. नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतर वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला.