विराट आणि कुंबळेचे लक्ष्य विजयाकडेच - बिन्नी
By Admin | Published: July 3, 2016 08:14 PM2016-07-03T20:14:59+5:302016-07-03T20:14:59+5:30
कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील समन्वय हा टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. आणि या दोघांचे फक्त विजयाकडेच असल्याचे भारताचा अष्टपैलु खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याने म्हटले.
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ३ : कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील समन्वय हा टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. आणि या दोघांचे फक्त विजयाकडेच असल्याचे भारताचा अष्टपैलु खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याने म्हटले.
चिन्नास्वामी स्टेडिअमवर पत्रकारांशी बोलताना बिन्नी म्हणाला की, ‘‘कुंबळे हे तांत्रिक बाबींच्या सहाय्याने विजय मिळवण्यासाठी रणनिती बनवण्यावर लक्ष देत आहेत. ते केवळ सकारात्मक गोष्टींकडेच लक्ष देतात. ते फक्त विजय मिळवण्यवर जोर देतात. आतापासून त्यांचे लक्ष वेस्ट इंडिज् विरोधातील मालिकेकडे लागले आहे. कुंबळे विजयाचा रोडमॅप बनवण्याकडे अधिक लक्ष देत आहे. ’’
बिन्नी पुढे म्हणाला की, कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा देखील कुंबळे यांच्याप्रमाणेच विचार करतो. आणि त्याचे लक्ष देखील विजयाकडेच आहे. कुंबळे आणि विराट दोन्ही विजयाचाच विचार करतात ही एक संतुलन साधण्यातील बाब आहे. विराट क्रिकेट बाबत चर्चा करतो. तर कुंबळे आम्ही सकारात्मक पद्धतीने खेळावे यावर जोर देतात. ’’
भारतीय अष्टपैलु खेळाडू माजी संचालक रवी शास्त्री यांच्याबाबत म्हणाला की, ‘‘ कुंबळे आणि शास्त्री यांच्यात फारसा फरक नाही. कारण दोघांचे लक्ष्य विजय हेच आहे.
वैयक्तिक कामगिरीबाबत बिन्नी म्हणाला की, ‘‘ माजी कर्णधार कुंबळे यांच्यासोबत उत्तम समन्वय आहे. गेल्या आठ वर्षांपासून कुंबळे मला खेळताना पाहत आहे. कुंबळे यांनी मला रणजीत खेळताना पाहिले आहे. आणि माझ्या खेळाबाबत माहिती आहे. ’’