विराट-अनुष्काची जोडी अप्रतिम - सानिया मिर्झा; मीडियाचा सामना योग्य पद्धतीने करण्याचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:32 AM2017-12-17T01:32:15+5:302017-12-17T01:32:34+5:30
‘क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी अप्रतिम आहे. त्यांनी एकमेकांसोबत दीर्घ वेळ घालविला. एकमेकांवर प्रेम करणाºयांनी लग्नगाठ बांधावी, यापेक्षा मोठा आनंद नाही,’ या शब्दांत टेनिसस्टार सानिया मिर्झा हिने या ‘हायप्रोफाईल’ जोडीचे विवाहाबद्दल अभिनंदन केले.
कोलकाता : ‘क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी अप्रतिम आहे. त्यांनी एकमेकांसोबत दीर्घ वेळ घालविला. एकमेकांवर प्रेम करणाºयांनी लग्नगाठ बांधावी, यापेक्षा मोठा आनंद नाही,’ या शब्दांत टेनिसस्टार सानिया मिर्झा हिने या ‘हायप्रोफाईल’ जोडीचे विवाहाबद्दल अभिनंदन केले. इटलीत लग्न करणाºया या जोडप्याला भारतात परतल्यानंतर मीडियापुढे जाताना ‘संयम पाळा’ असा मोलाचा सल्लाही दिला.
लग्नाच्या चार दिवसांनंतरही विरुष्काच्या लग्नाची जादू सोशल मीडियावर कायम आहे. याविषयी विचारताच सानिया म्हणाली, ‘प्रख्यात व्यक्तींच्या विवाहात अनेक अडथळे असतात. बाह्य जगाचा सामना करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असते. असे विवाह स्वत:पुरते मर्यादित नसल्याने अनेक गोष्टी जपाव्या लागतात.’
सानिया म्हणाली, ‘भारतीय मीडियाबद्दल माहिती ठेवणारे विराट- अनुष्का यांनी इटलीत लग्न केले. आता कधीतरी मीडियाचा सामना करावाच लागेल. लग्न ही बाब तशीही तणावपूर्ण. त्यात मीडियाद्वारे प्रचार होतो. माझ्या बहिणीचे लग्न झाले. तो हायप्रोफाईल विवाह नव्हता तरीही माझ्यावर मोठे दडपण आले होते.’ १२ डिसेंबरला विवाहाबद्दल सानियाने विराट-अनुष्काचे टिष्ट्वटरवर सर्वांत आधी अभिनंदन केले. ती म्हणाली, ‘विराट- अनुष्काला मी वैयक्तिक ओळखते. दोघे एकत्र आणि वेगवेगळेही शानदार व्यक्ती आहेत. त्यांच्या भावी आयुष्याला माझ्या शुभेच्छा.’ २१ आणि २६ डिसेंबर रोजी अनुक्रमे दिल्ली आणि मुंबईतील स्वागत सोहळ्याला हजेरी लावणार का, असे विचारताच सानिया म्हणाली, ‘मी त्या वेळी देशात राहणार की नाही, हे मला माहीत नाही.’ (वृत्तसंस्था)
गुडघ्याच्या दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियन ओपनमधून माघार
डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे सानिया पुढील महिन्यात आयोजित आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार नाही. २०१६ मध्ये सानियाने मार्टिना हिंगीससोबत या स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकाविले होते.
येथे सानिया म्हणाली, ‘माझ्या गुडघ्याचा त्रास वाढला आहे. सर्जरी करावी लागणार असल्याने काही महिने खेळापासून दूर असेन.’
रॉजर फेडररसारखे पुनरागमन करायचे आहे. सध्या इंजेक्शन घेत असूनही दुखणे कमी झालेले नाही. सर्जरी यशस्वी झाल्यानंतर राष्टÑकुल क्रीडा स्पर्धा आणि एशियाडमध्ये नक्की खेळणार असल्याचे सानियाने स्पष्ट केले.