परदेशात जिंकण्याचे 'विराट' आव्हान
By admin | Published: July 10, 2016 07:43 PM2016-07-10T19:43:28+5:302016-07-10T19:43:28+5:30
वेस्ट इंडिजविरुध्द त्यांच्या भूमिवर चार कसोटी सामन्यांची मालिका जिंकणे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना खूप आव्हानात्मक असेल
मनोज प्रभाकर : कर्णधार कोहली व प्रशिक्षक कुंबळेबाबत व्यक्त केले मत
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुध्द त्यांच्या भूमिवर चार कसोटी सामन्यांची मालिका जिंकणे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना खूप आव्हानात्मक असेल, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांनी व्यक्त केले.
रविवारी येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रभाकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, माझ्यामते विराटला ही मालिका जिंकणे खूप मोठे आव्हान असेल. कारण तो आपल्या मैदानावर नाही, तर परदेशात खेळत आहे. त्याचप्रमाणे ही मालिका केवळ विराटसाठीच नाही, तर युवा खेळाडू आणि प्रशिक्षक कुंबळे यांच्यासाठी खूप मोठे आव्हान असेल. टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत अग्रस्थान मिळवून देण्याचे प्राथमिक लक्ष्य सध्या कोहली आणि कुंबळे यांच्यापुढे आहे
हा कसोटी सामना असून आयपीएल सामना नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे. कसोटी सामना दोन - तीन खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीवर नाही, तर संपुर्ण संघाच्या सर्वोत्तम कामगिरीवर जिंकले जातात. तुम्हाला पाचही दिवस सातत्याने शानदार कामगिरी करण्याची गरज आहे, असेही प्रभाकर यांनी यावेळी सांगितले.
गोलंदाजीला अधिक महत्त्व देताना प्रभाकर यांनी सांगितले की, ह्यह्यकसोटी सामना फलंदाजांपेक्षा गोलंदाजांच्या जोरावर जिंकले जातात. भारतीय गोलंदाजांना विंडिज भूमीवर सातत्यपुर्ण कामगिरी करावी लागेल. त्याचवेळी एक महान गोलंदाज प्रशिक्षक बनल्यानंतर संघाची गोलंदाजी कशी होते, हे पाहणेही अधिक उत्सुकतेचे ठरेल.ह्णह्ण त्याचप्रमाणे, वेगवान गोलंदाजांनी केवळ गतीवर अधिक लक्ष न देता, स्विंगवर देखील पुर्ण लक्ष द्यावे. आयपीएलमध्ये भारतीय गोलंदाज स्विंगच्या तुलनेत वेगावर अधिक भर देत असल्याचे दिसून आले. लाइन-लेंथ आणि स्विंगवर लक्ष दिल्यास बळी मिळवण्यात यश मिळेल.ह्ण