विराटने सुरू केली तयारी
By admin | Published: June 20, 2016 03:14 AM2016-06-20T03:14:05+5:302016-06-20T03:14:05+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज व कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठीची तयारी सुरू केली आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज व कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठीची तयारी सुरू केली आहे.
भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध चार कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २१ जुलै रोजी एटिंगामध्ये, दुसरा ३० जुलैला जमैकामध्ये, तिसरा कसोटी सामना सेंट ल्युसियामध्ये, तर चौथा कसोटी सामना १८ आॅगस्ट रोजी खेळला जाणार आहे.
शनिवारी विराटने टिष्ट्वटरवर एक फोटो प्रसिद्ध केला असून, त्यात म्हटले आहे की, ‘पाहा कोण परत आले आहे. मी सरावासाठी जात असून मी
आनंदी आहे.’ विराट कोहलीला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
विराट कोहली सध्या प्रचंड फॉर्ममध्ये असून, त्याने आयपीएलमध्ये आपला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा करत ‘आॅरेंज कॅप’ पटकावली होती. या स्पर्धेपूर्वी झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही त्याने ‘मालिकावीर’चा पुरस्कार मिळवला होता.(वृत्तसंस्था)