विराट कोहली फलंदाजीत ‘एक नंबर’ स्थानावर

By admin | Published: March 30, 2016 02:53 AM2016-03-30T02:53:24+5:302016-03-30T02:53:24+5:30

तुफान फॉर्ममध्ये असलेल्या धडाकेबाज विराट कोहलीने सध्या सर्वच गोलंदाजांच्या मनात धडकी भरविली असून, नुकत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या

Virat Kohli batted at number one position | विराट कोहली फलंदाजीत ‘एक नंबर’ स्थानावर

विराट कोहली फलंदाजीत ‘एक नंबर’ स्थानावर

Next

नवी दिल्ली : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या धडाकेबाज विराट कोहलीने सध्या सर्वच गोलंदाजांच्या मनात धडकी भरविली असून, नुकत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत त्याने फलंदाज म्हणून अग्रस्थान पटकावले आहे. त्याचवेळी टीम इंडियानेही आपले अग्रस्थान कायम राखण्यात यश मिळविले आहे.
कोहलीने गत चार सामन्यांत १८४ धावा फटकावताना १३२ ची जबरदस्त धावगती राखली असून, त्याने ९२ च्या शानदार सरासरीने फटकेबाजी केली आहे. विशेष म्हणजे, आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार ही क्रमवारी जाहीर होण्याआधी कोहली आॅस्टे्रलियाच्या अ‍ॅरोन फिंचहून २४ अंकांनी पिछाडीवर होता. मात्र, आता कोहलीने तब्बल ६८ गुणांनी मजबूत आघाडी घेतली आहे. त्याचवेळी गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये मात्र भारताला धक्का बसला आहे.
वेस्ट इंडीजच्या सॅम्युअल्स् बद्री याने पुन्हा एकदा आयसीसी टी-२० क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावताना भारताचा टॉप स्पिनर रविचंद्रन अश्विनला मागे टाकले. बद्रीने आतापर्यंत चार सामन्यांत एकूण ६ बळी घेतले असून, अश्विनने चार सामन्यांतून चार बळी घेतले आहेत. यामुळे अश्विनची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहीरने दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
सांघिक क्रमवारीवर नजर टाकल्यास अव्वल पाचपैकी चार संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात दिल्ली व मुंबई येथे खेळतील. बलाढ्य भारताने १२७ गुण कायम राखताना अग्रस्थान कायम राखले आहे. त्याचवेळी विश्वचषकमध्ये आतापर्यंत अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडला सहा गुणांचा फायदा झाला असून, त्यांनी दोन स्थानांनी प्रगती करीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. वेस्ट इंडीजनेही दोन अंकांनी प्रगती करताना तृतीय स्थान पटकावले. तर
द. आफ्रिका आणि इंग्लंड प्रत्येकी ११५ गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.

टॉप ५
फलंदाज
१. विराट कोहली (भारत - ८७१ गुण),
२. अ‍ॅरोन फिंच (आॅस्टे्रलिया - ८०३),
३. मार्टिन गुप्टील (न्यूझीलंड - ७६२),
४. फाफ डू प्लेसिस (द. आफ्रिका - ७४१),
५. अ‍ॅलेक्स हेल्स (इंग्लंड - ७३७).

गोलंदाज
१. सॅम्युअल्स् बद्री (वेस्ट इंडीज - ७५३),
२. इम्रान ताहीर (द. आफ्रिका - ७४०),
३. रविचंद्रन अश्विन (भारत - ७२५),
४. शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान - ६७४),
५. काएल एबॉट (द. आफ्रिका - ६७१)

अष्टपैलू
१. शेन वॉटसन (आॅस्टे्रलिया - ३७३),
२. शाकिब अल हसन (बांगलादेश - ३४६),
३. शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान - ३३२),
४. ग्लेन मॅक्सवेल (आॅस्टे्रलिया - ३२९),
५. मार्लेन सॅम्युअल्स् (वेस्ट इंडीज - २७६).

अष्टपैलू
१. शेन वॉटसन (आॅस्टे्रलिया - ३७३),
२. शाकिब अल हसन (बांगलादेश - ३४६),
३. शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान - ३३२),
४. ग्लेन मॅक्सवेल (आॅस्टे्रलिया - ३२९),
५. मार्लेन सॅम्युअल्स् (वेस्ट इंडीज - २७६).

देशगुण
१. भारत१२७
२. न्यूझीलंड१२२
३. वेस्ट इंडीज१२०
४. द. आफ्रिका११५
५. इंग्लंड११५

सांघिक क्रमवारीत लक्ष वेधले ते अफगाणिस्तानने. गेल्या काही सामन्यांपासून चमकदारक खेळाने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधलेल्या अफगाणिस्तानने यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा निरोप घेताना बलाढ्य वेस्ट इंडीजला नमवून सनसनाटी निकाल नोंदविला. या विजयाचा फायदा संघाला झाला असून, अफगाण संघ ८१ गुणांसह नवव्या स्थानी आहे. तर त्यांच्याखाली बांगलादेश ७४ गुणांसह दहाव्या स्थानी विराजमान आहे. टी-२० टॉप टेन क्रमवारीत आयसीसीचा सहयोगी सदस्य म्हणून अफगाणिस्तान एकमेव संघ आहे.

Web Title: Virat Kohli batted at number one position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.