विराट कोहली वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
By Admin | Published: January 1, 2016 12:40 AM2016-01-01T00:40:29+5:302016-01-01T05:42:28+5:30
बीसीसीआयतर्फे गुरुवारी जाहीर झालेल्या पुरस्कारात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. ५ जानेवारी रोजी
नवी दिल्ली : बीसीसीआयतर्फे गुरुवारी जाहीर झालेल्या पुरस्कारात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. ५ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात महिलांमध्ये हा पुरस्कार मिताली राजला प्रदान करण्यात येईल.
आॅस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान महेंद्रसिंह धोनीने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधारपद सांभाळणाऱ्या २७ वर्षीय फलंदाज कोहलीने आपल्या नेतृत्वाखाली काही चांगले निकाल दिले.
मितालीने यंदाच्या मोसमात वन-डेमध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय व एकूण दुसरी महिला फलंदाज ठरली. मितालीला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी एम. ए. चिदंबरम ट्रॉफी देण्यात येईल. कर्नाटकच्या रॉबिन उथप्पाला रणजी स्पर्धेत सर्वाधित धावा फटकावण्यासाठी माधवराव शिंदे पुरस्काराने गौरविण्यात येईल. त्याने ११ सामन्यांत ५०.६६ च्या सरासरीने ९१२ धावा फटकावल्या. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाच्या पुरस्कारासाठी कर्नाटकचा आर. विनयकुमार व मुंबईचा शार्दुल ठाकूर यांची निवड करण्यात आली. (वृत्तसंस्था)
पुरस्कार विजेते
कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार : सय्यद किरमाणी
पॉली उमरीगर पुरस्कार : विराट कोहली
लाला अमरनाथ पुरस्कार (रणजी
ट्रॉफी २०१४-१५ या मोसमातील सर्वोत्तम अष्टपैलू) : जलज सक्सेना (मध्य प्रदेश)
लाला अमरनाथ पुरस्कार (स्थानिक मर्यादित षटकांचे क्रिकेट : सर्वोत्तम अष्टपैलू) : दीपक हुड्डा (बडोदा)
माधवराव शिंदे पुरस्कार (सर्वाधिक धावा) : रॉबिन उथप्पा (कर्नाटक).
माधवराव शिंदे पुरस्कार
(सर्वाधिक बळी ) : आर. विनय कुमार (कर्नाटक) आणि शार्दुल ठाकूर (मुंबई).
एम. ए. चिदंबरम ट्रॉफी (अंडर-२३ गटातील सर्वोत्तम क्रिकेटपटू) : अल्मस शौकत (उत्तर प्रदेश).
एम. ए. चिदंबरम ट्रॉफी (अंडर -१९ गटातील सर्वोत्तम खेळाडू) : अनमोलप्रीतसिंग (पंजाब).
एम. ए. चिदंबरम ट्रॉफी (अंडर-१६ गटातील सर्वोत्तम खेळाडू) : शुभम गिल (पंजाब)
एम. ए. चिदंबरम ट्रॉफी (२०१४-१५ मोसमातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू) : मिताली राज (रेल्वे).
एम.ए. चिदंबरम ट्रॉफी (ज्युनिअर गटातील सर्वोत्तम महिला खेळाडू) : देविका वैद्य (महाराष्ट्र).
सर्वोत्तम पंच (स्थानिक क्रिकेट) : ओ. नंदन. सर्वोत्तम कामगिरी : कर्नाटक क्रिकेट संघटना (१४ गुण).