ऑस्ट्रेलियाला नमवण्याची ही सुवर्णसंधी - विराट कोहली

By admin | Published: March 25, 2015 01:30 PM2015-03-25T13:30:58+5:302015-03-25T14:13:16+5:30

ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी वर्ल्ड कप सेमीफायनलपेक्षा आणखी जास्त चांगली संधी कुठली असून शकते असे उद्गार काढत टीम इंडिया गुरुवारच्या रणधुमाळीसाठी सज्ज असल्याचे संकेत विराट कोहलीने दिले आहेत.

Virat Kohli is the best player to beat Australia | ऑस्ट्रेलियाला नमवण्याची ही सुवर्णसंधी - विराट कोहली

ऑस्ट्रेलियाला नमवण्याची ही सुवर्णसंधी - विराट कोहली

Next
>ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २५ - ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी वर्ल्ड कप सेमीफायनलपेक्षा आणखी जास्त चांगली संधी कुठली असून शकते असे उद्गार काढत टीम इंडिया गुरुवारच्या रणधुमाळीसाठी सज्ज असल्याचे संकेत विराट कोहलीने दिले आहेत. ऑस्ट्रेलियातील एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कोहलीने अत्यंत चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय गोलंदाजांना आत्तापर्यंतच्या ड्रीमरनचे श्रेय दिले आहे.
विश्वचषछकापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कसोटी मालिकेमध्ये तसेच नंतरच्या तिरंगी एकदिवसीय लढतीमध्ये भारताने सपाटून मार खाल्ला होता. परंतु विश्वचषकातले सातही सामने भारताने जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली असून ही विजयाची मालिका सेमीफायनलमध्ये अबाधित राहील आणि भारत कांगारूंना नमवून आधीच्या पराभवाचं उट्टं काढेल अशी आशा भारतीय क्रिकेट शौकिनांना आहे. तर या प्रदीर्घ दौ-यादरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाला एकदाही हरवलेले नसल्याची आठवण ग्लेन मॅक्सवेलने करून दिली आहे. परंतु नजीकचा भूतकाळ विसरून भारताने आता मुसंडी मारली असून तो ऑस्ट्रेलियालाही नमवेल असा विश्वास कोहलीला आहे.
आमच्याकडे सलग झालेल्या पराभवांनंतर वेळ कमी होता, म्हणून आम्ही सरळ आमच्या चुका लिहून काढल्या, त्यावर परीश्रम घेतले आणि चांगले बदल घडवून आणल्याचे विराटने सांगितले. अर्थात, पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणा-या कोहलीला नंतरच्या एकाही सामन्यात अर्धशतकी मजल मारता आलेली नाही. उद्याच्या कांगारूंच्या सामन्यात त्याने ही कसर भरून काढली तर ती भारतासाठी जमेची बाजू ठरणार आहे. 
मोहम्मद शमीने ६ सामन्यांत १६ बळी घेतले असून तो विश्वषचकातील सर्वोत्तम गोलंदाज बनण्याच्या मार्गावर आहे. त्याच्याच जोडीला उमेश यादव, मोहीत शर्मा व आर अश्विनही चांगली कामगिरी करत आहेत. गोलंदाजांच्या सुधारलेल्या कामगिरीमुळे भारतीय फलंदाजीवरील दडपण कमी झाले असून त्याचा फायदा कांगारुंविरोधातही मिळण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंतच्या सगळ्या सामन्यांमध्ये भारताने प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद केले असून उद्याही याची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा भारतीय करत आहेत.
दरम्यान, स्लेजिंगसाठी कुप्रसिद्ध असलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू गुरुवारच्या सामन्यातही आपल्या या कलेचा वापर भारतीयांना चिडवण्यासाठी करतील हे उघड आहे. स्लेजिंग हे त्यांचे एक प्रमुख शस्त्र असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडुंनी अनेकवेळा सांगितलेले आहे. त्यावर शांत राहणं, दुर्लक्ष करणं आणि भरीस न पडणं हा मार्ग असून शांत डोक्याचा भारतीय कर्णधार महेंद्रसिंग ढोणी तेच करेल अशी शक्यता आहे.

Web Title: Virat Kohli is the best player to beat Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.