आयसीसीच्या जागतिक टी-२० संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली

By admin | Published: April 4, 2016 05:50 PM2016-04-04T17:50:13+5:302016-04-04T17:52:27+5:30

आयसीसीने निवडलेल्या वर्ल्ड टी-२० संघाच्या कर्णधारपदी भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीची निवड केली आहे.

Virat Kohli as captain of ICC World Twenty20 team | आयसीसीच्या जागतिक टी-२० संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली

आयसीसीच्या जागतिक टी-२० संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली

Next

ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. ४ - आयसीसीने निवडलेल्या टी-२० जागतिक संघाच्या कर्णधारपदी भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीची निवड केली आहे. या संघामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरालाही स्थान मिळाले आहे. 
 
यंदाच्या टी-२० वर्ल्डकपचा मालिकावीर ठरलेल्या विराटने ही स्पर्धा आपल्या फलंदाजीने गाजवली. वर्ल्डकप टी-२०मधील कामगिरीच्या आधारावर माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी पुरुष आणि महिला संघाची निवड केली. या वर्ल्डकपमध्ये कोहलीन १३६.५० च्या सरासरीने  एकूण २७३ धावा केल्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता. 
 
विराटने या स्पर्धेत २९ चौकार आणि पाच षटकार लगावले. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांमध्ये तमिम इक्बालच्या पाठोपाठ दुस-या स्थानावर आहे. तमिमने २९५ धावा केल्या. नेहराने फक्त पाच विकेट घेतल्या पण धावा रोखण्यामध्ये त्याची गोलंदाजी किफायतशीर ठरली. 
 
आयसीसीने निवडलेला टी-२०चा जागतिक संघ - जेसन रॉय (इंग्लंड), क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका, यष्टीरक्षक), विराट कोहली ( भारत, कर्णधार), जो रुट ( इंग्लंड), जोस बटलर ( इंग्लंड), शेन वॉटसन ( ऑस्ट्रेलिया), अँड्रे रसेल ( वेस्ट इंडिज), मिचेल सेंटर ( न्यूझीलंड), डेव्हीड विले ( इंग्लंड), सॅम्युल बद्री ( वेस्ट इंडिज), आशिष नेहरा ( भारत) १२ वा खेळाडू मुस्ताफिझूर रहमान ( बांगलादेश)
 

Web Title: Virat Kohli as captain of ICC World Twenty20 team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.