फिटनेससाठी विराट कोहलीनं केला मोठा त्याग
By admin | Published: January 18, 2017 01:36 PM2017-01-18T13:36:29+5:302017-01-18T13:36:29+5:30
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीच्या फिटनेसमागील सिक्रेट जाणून घ्या बातमीद्वारे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली क्रिकेट विश्वातील फिट खेळाडूंमध्ये गणला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये विराटने आपल्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. याचा सकारात्म परिणाम त्याच्या खेळातही पाहायला मिळत आहे.
एक काळ असा होता की विराट बटर चिकन, काठी रोल आणि मटण रोलसारखे पदार्थ खाल्ल्याशिवाय राहू शकत नव्हता. मात्र आता त्याने हे पदार्थ वर्ज्य केले आहेत, ही आठवण विराटचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी सांगितले.
क्रिकेट वेबसाइट क्रिकेटनेक्स्टसोबत संवाद साधताना राजकुमार शर्मा यांनी विराट कोहलीच्या कामगिरीचे कौतुक केले.
संपूर्ण जग कोहलीचा खेळ आणि फिटनेसची स्तुती करत आहेत. मात्र फिटनेससाठी त्याने आवडीच्या पदार्थांच्या बाबतीत बलिदान दिल्याचेही त्यांनी सांगितले. 'कोहली आपल्या आहाराबाबत एवढा तत्पर आहे की जेव्हा तो घरी येतो तेव्हा पॅक्ड ज्यूसऐवजी केवळ फळांचा ताजा ज्यूस पितो. गेल्या दोन-तीन वर्षात विराट कोहलीने आपला फिटनेस आणि आहारसंदर्भातील सवयींमध्ये सातत्य कायम ठेवले आहे.
फिटनेससंदर्भात विराट गंभीर असून त्याच्या घरातही जिम आहे. आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये यशस्वी होण्यासाठी धडधाकट असणे फार गरजेचं आहे, असे कोहलीचे मानणे आहे.