विराट कोहली क्षेत्ररक्षण लावण्याचे स्वातंत्र्य देतो
By admin | Published: February 18, 2017 01:10 AM2017-02-18T01:10:57+5:302017-02-18T01:10:57+5:30
एका चांगल्या गोलंदाजाला चांगल्या कर्णधाराची गरज असते. यादृष्टीने मी ‘लकी’ आहे. बळी घेता यावे या दृष्टीने क्षेत्ररक्षण लावण्याचे
नवी दिल्ली : एका चांगल्या गोलंदाजाला चांगल्या कर्णधाराची गरज असते. यादृष्टीने मी ‘लकी’ आहे. बळी घेता यावे या दृष्टीने क्षेत्ररक्षण लावण्याचे विराट कोहलीकडून मला संपूर्ण स्वातंत्र्य मिळते. मी स्वत:च्या डावपेचानुसार क्षेत्ररक्षण लावतो, असे वेगवान गोलंदाज उमेश यादवचे मत आहे.
उत्कृष्ट आऊटस्विंगर टाकण्यासाठी प्रसिद्ध असलेला उमेश आॅस्ट्रेलियाविरुद्ध इनस्विंग चेंडू टाकण्यास उत्सुक आहे. तो म्हणाला, ‘मी नेहमी १४० प्रतिताशी वेगाने आऊटस्विंग गोलंदाजी करतो. पण, इनस्विंगवरदेखील भरपूर मेहनत घेतल्यामुळे आस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जाळ्यात अडकविण्याबद्दल आश्वस्त आहे.
बांगला देशचा शाकिब अल हसन याने हैदराबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी उमेशची गोलंदाजी करियरमध्ये कुठल्याही गोलंदाजाकडून झालेली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी होती, असे गौरवोद्गार काढले होते. यासंदर्भात विचारताच उमेश म्हणाला, ‘मला बळी घेता आले असते तर मी याला ‘परफेक्ट स्पेल’ संबोधले असते. पण, असे घडले नाही. हा स्पेल पहाल तर कळेल की मी शकिबला अनेकदा ‘बिट’ केले. गोलंदाजाची दिशा फारच अचूक होती.’
उमेशने द. आफ्रिकेविरुद्ध २०१५ मध्ये केलेला अचूक मारा करियरमधील सर्वश्रेष्ठ स्पेल असल्याचे सांगितले. तो म्हणतो, ‘द. आफ्रिकेविरुद्ध २०१५ मध्ये नवी दिल्लीत मी भेदक मारा केला. त्यावेळी माझ्यापुढे दिग्गज फलंदाज होते आणि गोलंदाजी करणे सोपे नव्हते.’ (वृत्तसंस्था)