विश्वचषकाच्या दृष्टीने मालिका महत्त्वाची : कोहली
By Admin | Published: November 2, 2014 01:01 AM2014-11-02T01:01:22+5:302014-11-02T01:01:22+5:30
विश्वकप स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर संघातील अद्याप काही स्थान अनिश्चित असल्यामुळे, श्रीलंकेविरुद्ध तातडीने आयोजित केलेल्या या मालिकेत चुरस अनुभवाला मिळेल,
कटक : विश्वकप स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर संघातील अद्याप काही स्थान अनिश्चित असल्यामुळे, श्रीलंकेविरुद्ध तातडीने आयोजित केलेल्या या मालिकेत चुरस अनुभवाला मिळेल, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन वन-डे सामन्यांत संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झालेल्या विराट कोहलीने व्यक्त केली.
पहिल्या लढतीच्या पूर्वसंध्येला बोलताना कोहली म्हणाला, ‘आगामी महिन्यांमध्ये संघात बदल बघायला मिळतील. त्यामुळे विश्वकप स्पर्धेपूर्वी संघाचा समातोल साधण्यास मदत मिळेल. विश्वकप स्पर्धेत विशेष अवधी शिल्लक नसल्यामुळे प्रत्येक खेळाडू मिळालेल्या संधीचे सोने करण्यास उत्सुक आहे. संघाचे नेतृत्व करण्याची आवड आहे.’
कोहली पुढे म्हणाला, ‘भुवनेश्वर व शमी गेल्या काही वर्षापासून संघाचे नियमित सदस्य आहेत. धोनीचा अनुभव आमच्यासाठी उपयुक्त आहे. पण त्याच्या अनुपस्थितीत रिद्धिमान साहा, वरुण अॅरोन यांच्यासारख्या खेळाडूंना संघातील स्थान निश्चित करण्याची संधी आहे.