विराट कोहली अव्वल १० मध्ये एकमेव भारतीय

By admin | Published: May 31, 2017 12:49 AM2017-05-31T00:49:06+5:302017-05-31T00:49:06+5:30

विराट कोहली आयसीसी वन-डे क्रिकेटपटूंच्या मानांकनामध्ये अव्वल १० मध्ये समावेश असलेला एकमेव भारतीय खेळाडू आहे.

Virat Kohli is the only Indian in the top 10 | विराट कोहली अव्वल १० मध्ये एकमेव भारतीय

विराट कोहली अव्वल १० मध्ये एकमेव भारतीय

Next

लंडन : विराट कोहली आयसीसी वन-डे क्रिकेटपटूंच्या मानांकनामध्ये अव्वल १० मध्ये समावेश असलेला एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरे स्थान कायम राखले आहे.
वैयक्तिक मानांकनासाठी चुरस असल्यामुळे आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित होते. या स्पर्धेत अव्वल आठ संघांचा सहभाग आहे. त्यातील मानांकनामध्ये आघाडीच्या खेळाडूंदरम्यान विशेष फरक नाही. अव्वल तीन फलंदाज दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स (८७४ मानांकन गुण), आॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (८७१ मानांकन गुण) आणि विराट कोहली (८५२ मानांकन गुण) यांच्यामध्ये केवळ २२ अंकांचा फरक आहे. फलंदाजांच्या यादीमध्ये अव्वल २० मध्ये रोहित शर्मा (१२ वे स्थान), महेंद्रसिंह धोनी (१३ वे स्थान) आणि शिखर धवन (१५ वे स्थान) यांचा समावेश आहे. धवनची दोन स्थानाने घसरण झाली आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत एकही भारतीय अव्वल १० मध्ये नाही. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा अव्वल स्थानी आहे. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीसोबत संयुक्तपणे ११ व्या स्थानी, तर अमित मिश्रा १३ व्या स्थानी आहे. या दोन्ही खेळाडूंचा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश नाही. रविचंद्रन आश्विन संयुक्तपणे १८ व्या स्थानी आहे. अव्वल तीन गोलंदाजांमध्ये रबाडा (७२४ मानांकन गुण), इम्रान ताहिर (७२२ मानांकन गुण) आणि मिशेल स्टार्क (७०१ मानांकन गुण) यांच्यादरम्यान केवळ २३ मानांकन गुणांचे अंतर आहे.
भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे प्रत्येकी ४ फलंदाज व न्यूझीलंडचे ३ आणि आॅस्ट्रेलिया व पाकिस्तानचे प्रत्येकी २ फलंदाज अव्वल २० मध्ये आहेत. त्याचप्रमाणे गोलंदाजीमध्ये बांगलादेश व इंग्लंडचे प्रत्येकी तीन व न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व आॅस्ट्रेलियाच्या प्रत्येकी दोन गोलंदाजांचा अव्वल २० मध्ये समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये बांगलादेशचा शाकीब-अल-हसन अव्वल स्थानी आहे. इंग्लंडच्या तीन खेळाडूंचा अव्वल १० मध्ये समावेश आहे. द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाविजय साकरणाऱ्या इंग्लंड संघाला दोन मानांकन गुणांचा लाभ झाला आहे. संघांच्या क्रमवारीत आघाडीच्या संघांदरम्यान विशेष अंतर नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लढत रंगतदार राहील. वन-डेमध्ये आघाडीच्या ५ संघांदरम्यान द. आफ्रिका (१२२ गुण), आॅस्ट्रेलिया (११८ गुण), भारत (११७ गुण), न्यूझीलंड (११४ गुण) व इंग्लंड (११२ गुण) यांच्यादरम्यान विशेष मानांकन गुणांचे अंतर नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Virat Kohli is the only Indian in the top 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.