आयपीएलसाठी कोहलीची कसोटीतून माघार : ब्रॅड हॉज

By Admin | Published: March 28, 2017 01:23 AM2017-03-28T01:23:15+5:302017-03-28T01:23:15+5:30

रांची येथील तिसऱ्या कसोटीत जखमी झाल्यानंतर धरमशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घेण्याच्या निर्णयावर

Virat Kohli retires from Test cricket: Brad Hodge | आयपीएलसाठी कोहलीची कसोटीतून माघार : ब्रॅड हॉज

आयपीएलसाठी कोहलीची कसोटीतून माघार : ब्रॅड हॉज

googlenewsNext

मेलबर्न : रांची येथील तिसऱ्या कसोटीत जखमी झाल्यानंतर धरमशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घेण्याच्या  विराटच्या निर्णयावर आॅस्ट्रेलियन फलंदाज ब्रॅड हॉजने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी ताजतवाने राहता यावे, यासाठीच कोहलीने चौथ्या कसोटीत खेळण्याचे टाळले, असा अजब तर्क हॉजने काढला आहे.
आयपीएलचा संघ गुजरात लॉयन्सचा कोच असलेला हॉज म्हणाला, ‘‘पाच एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोहली खेळताना दिसला तर ती एक वाईट घटना असेल. यातून एक वेगळाच संदेश जाईल, असे हॉजने म्हटले आहे.
एका क्रीडावाहिनीच्या चर्चेचा हवाला देऊन डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राने लिहिले आहे, की कोहलीच्या खांद्याला जबर दुखापत झाली असल्याचे चित्र दिसत आहे, अशात तो एका आठवड्यात आयपीएलमध्ये खेळणार नाही, अशी मला अपेक्षा आहे. कसोटी सामन्यातून माघार घेऊन पुढच्याच आठवड्यात आयपीएलमध्ये तो खेळला तर यातून कोहलीने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण मालिकेऐवजी आयपीएलला महत्त्व दिले, असा वाईट संदेश पसरला जाईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Virat Kohli retires from Test cricket: Brad Hodge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.