विराट कोहलीला सूर गवसेल

By admin | Published: May 18, 2017 03:58 AM2017-05-18T03:58:46+5:302017-05-18T03:58:46+5:30

इंग्लंडमध्ये १ जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विराटला सूर गवसेल. त्याच्या सध्याच्या खराब फॉर्मबद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही

Virat Kohli will win | विराट कोहलीला सूर गवसेल

विराट कोहलीला सूर गवसेल

Next

मुंबई : इंग्लंडमध्ये १ जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विराटला सूर गवसेल. त्याच्या सध्याच्या खराब फॉर्मबद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही, असा विश्वास महान क्रिकेटपटू कपिलदेव यांनी बुधवारी व्यक्त केला.
चॅम्पियन्समध्ये गतविजेत्या भारताला पहिला सामना ४ जून रोजी पाकविरुद्ध खेळायचा आहे. १९८३ मध्ये विश्वचषक जिंकून देणारे कपिल म्हणाले, ‘‘डेथ ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहचा
मारा निर्णायक ठरेल. मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा हा खेळाडू इतका पुढे जाईल, असे वाटलेही नव्हते. पण
तो मानसिकदृष्ट्या कणखर असा गोलंदाज आहे.’’
बुमराहसारख्या युवा खेळाडूला पाहिले, की याची जागा अन्य कुणी घेऊ शकेल, असे वाटत नाही. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी
हे वेगवान गोलंदाज अप्रतिम मारा करतात. फिरकीत आश्विन आणि रवींद्र जडेजा
हे देशाचे सर्वोत्तम गोलंदाज आहेत,
असे कपिल यांनी एका प्रश्नाच्या
उत्तरात स्पष्ट केले.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेला संघ कागदावर तरी बलाढ्य वाटतो आहे. पण माझ्या मते यंदा भारतीय संघ खरोखर भक्कम असाच आहे. महेंद्रसिंह
धोनी आणि युवराजसिंग यांच्या अनुभवाचादेखील लाभ मिळणार असल्याचे कपिल यांना वाटते. या दोघांनी क्षमतेनुरूप कामगिरी करीत युवा खेळाडूंपुढे आदर्श निर्माण करायला हवा, असे कपिल यांचे मत आहे.
भारत-पाक सामन्याबद्दल ते
म्हणाले, ‘‘भारतीय संघ सरस असून चांगला खेळ करीत आहे. दुसरीकडे पाककडे गमाविण्यासारखे काहीच नसल्याने सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. पण भारत बाजी
मारेल.’’ (वृत्तसंस्था)

विराटवर विश्वास
कपिल म्हणाले, ‘‘विराटच्या कर्तृत्वावर मला विश्वास असल्याने त्याच्या खेळावर शंका घेणे मला पटत नाही. सध्या तो चांगला खेळत नसला तरी लवकरच धावा काढेल. तो धावा काढायला लागेल, तेव्हा संघातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. कर्णधार फॉर्ममध्ये असेल तर इतरांसाठी ते चैतन्यदायी ठरते.’’

कोहलीने मागच्या सत्रात १६ कसोटी सामन्यांत ९७३ धावा केल्यानंतर आयपीएलमध्ये दहा सामन्यांत केवळ ३०८ धावा केल्या.

Web Title: Virat Kohli will win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.