युवराजच्या धडाकेबाज खेळीने भाराताचा श्रीलंकेवर विराट विजय
By admin | Published: March 1, 2016 10:23 PM2016-03-01T22:23:12+5:302016-03-01T22:57:30+5:30
विराट कोहलीची (नाबाद ५६) संयमी अर्धशतकी खेळी आणि युवराजच्या ३५ धांवाच्या आक्रमक खेळीच्या बळावर भारताने श्रीलंकेला ५ गड्यांनी पराभूत केले.
Next
ऑनलाइन लोकमत
मिरपूर, दि. १ - विराट कोहलीची (नाबाद ५६) संयमी अर्धशतकी खेळी आणि युवराजच्या ३५ धांवाच्या आक्रमक खेळीच्या बळावर श्रीलंकेला ५ गड्यांनी पराभूत करत धोनी ब्रिगेडने २०१६च्या आशिया चषकाच्या अंतीम फेरीत धडक मारली आहे. आज पुन्हा एकदा विराट कोहलीच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर भारताने आशिया चषकात सलग तिसरा विजय संपादन केला.
विराटने ४७ चेंडूचा सामना करताना ७ चौकाराच्या मदतीने नाबाद ५६ धावांची खेळी केली. तर सुर गवसेलेल्या युवराजने धडाकेबाज फलंदाजी करताना १८ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३५ धावा काढून विजयात सिंहाचा वाटा उचलला. युवराज बाद झाला त्यावेळी सामना पुर्णपणे भारताच्या बाजुने झुकला होता. पण हार्दिक पांड्या २ धावावर बाद झाल्याने सामन्यात चुरस निर्माण झाली होती. पंरतु मैदानावर एका बाजूने विराट कोहली असल्यामुळे भारताचे पारडे मजबूत होते. धोनीने ४ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.
श्रीलंकेच्या १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली दोन्ही सलामीवीर १६ धावांत बाद झाले होते. ११ धावांवर सलामीवीर धवनच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. कुलसेकराने त्याला एका धावेवर चंडीमलकरवी झेलबाद केले. त्यानंतर रोहित शर्मा १५ धावांवर कुलसेकराचा बळी ठरला. सुरेश रैनाला शांकाने २५ धावांवर बाद केले. विराट आणि रैनाने तिस-या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली होती.त्यांनतर आलेल्या युवराजने सांन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली धडाकेबाज खेळी करत भारताला तिसरा विजय मिळवून दिला.
त्यापुर्वी, नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेने निर्धारीत २० षटकात नऊ बाद १३८ धावा केल्या होत्या. कपुगेंदरा ३०, श्रीवर्धने २२ आणि अन्य फलंदाजांच्या छोटया खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारताला हे लक्ष्य दिले होते.
श्रीलंकेकडून कपुगेंदरा आणि श्रीवर्धनमध्ये पाचव्या विकेटसाठी सर्वाधिक ४३ धावांची भागीदारी झाली. भारताकडून बुमराह, पांडया आणि अश्विनने प्रत्येकी दोन आणि नेहराने एक गडी बाद केला. श्रीलंकेला सहा धावांवर पहिला तर, १५ धावांवर दुसरा धक्का बसला. सलामीवीर चंडीमल अवघ्या ४ धावांवर बाद झाला. नेहराने त्याला धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर जयसूर्याला तीन धावांवर बुमरहाने धोनीकरवी झेलबाद केले. दिलशानला १८ धावांवर पांडयाने अश्विनकरवी झेलबाद केले. संघाच्या ५७ धावा असताना कर्णधार मॅथ्यूज १८ धावांवर बाद झाला. पांडयाने त्याच्या यष्टया वाकवल्या. श्रीवर्धनेला अश्विनने २२ धावांवर रायनाकरवी झेलबाद केले.