विराट कोहलीची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 03:16 PM2018-09-17T15:16:25+5:302018-09-17T15:16:47+5:30
कोहलीबरोबर यावेळी वेटलिफ्टर मिराबाई चानूच्या नावाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारसर करण्यात आली.
नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. कोहलीबरोबर यावेळी वेटलिफ्टर मिराबाई चानूच्या नावाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारसर करण्यात आली.
Cricketer Virat Kohli and weightlifter Mirabai Chanu have been recommended for Rajiv Gandhi Khel Ratna award: Khel Ratna, Arjuna Award committee sources pic.twitter.com/SSlDHjlY4I
— ANI (@ANI) September 17, 2018
रीषभ पंतचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांची यावेळी द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. पंतबरोबर आशीष नेहरा आणि शिखर धवन यांनाही सिन्हा यांनी मार्गदर्शन केले आहे. तीन खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणाऱ्या सिन्हा यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळावा, अशी काही क्रिकेटपटूंची इच्छा आहे.
टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमल याचे पिता आणि मार्गदर्शक श्रीनिवास राव यांचीही द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत आठ पदके जिंकली आहेत. त्याचबरोबर आशियाई स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदकही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भारताने जिंकले आहे.