कोहलीपुढे साहेबांचे ‘विराट’ आव्हान

By admin | Published: November 4, 2016 04:08 AM2016-11-04T04:08:24+5:302016-11-04T04:08:24+5:30

आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलेल्या टीम इंडियाचे पुढील टार्गेट क्रिकेटचे जन्मदाते असलेल्या इंग्लंडला पराभूत करण्याचे आहे.

Virat Kohli's 'Virat' challenge before Kohli | कोहलीपुढे साहेबांचे ‘विराट’ आव्हान

कोहलीपुढे साहेबांचे ‘विराट’ आव्हान

Next


मुंबई : न्यूझीलंडला ३-० असे लोळवून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलेल्या टीम इंडियाचे पुढील टार्गेट क्रिकेटचे जन्मदाते असलेल्या इंग्लंडला पराभूत करण्याचे आहे. त्यात, सध्या भारताचे प्रमुख फलंदाज व गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने भारतीय पाठीराख्यांना आपल्या विजयाची खात्री वाटत आहे. परंतु, आकडेवारीवर नजर टाकल्यास कळेल, की भारतीय फलंदाजीचा कणा असलेला कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्ध सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळेच ही मालिका त्याच्यासाठी मोठी परीक्षा ठरणार आहे.
जगभरातील गोलंदाजांची परीक्षा घेणारा कोहली इंग्लिश गोलंदाजांपुढे मात्र अपयशी ठरला आहे. २०१४ साली भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची मालिका १-३ अशी गमावली होती. या मालिकेतील १० डावांमध्ये कोहलीला केवळ १३४ धावा काढता आल्या होत्या. या वेळी पराभवानंतर टीकाकारांच्या टार्गेटवर कोहलीदेखील होता. ही मालिका कोहलीसाठी एका वाईट स्वप्नासारखी होती. इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने कोहलीला तब्बल ४ वेळा आपला शिकार बनवले होते. त्या मालिकेत कोहली अर्धशतक झळकावण्यातही अपयशी ठरला होता. तसेच, दोन वेळा तो भोपळाही न फोडता परतला होता.
परंतु, तरीही इंग्लंडविरुद्धचे अपयश त्याला सलत आहे. सध्या त्याचा फॉर्म पाहता हे अपयश धुवून काढण्यात कोहली नक्की यशस्वी होईल, अशी चर्चा आहे.
२०१४मधील इंग्लंड मालिकेनंतर कोहलीच्या खेळीमध्ये ‘विराट’ बदल झाला. आॅस्टे्रलिया (२०१४-१५), श्रीलंका (२०१५), वेस्ट इंडीज (२०१६) आणि न्यूझीलंड (२०१६) विरुद्ध त्याने खोऱ्याने धावा काढल्या.

Web Title: Virat Kohli's 'Virat' challenge before Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.