विराटने मला नैसर्गिक खेळ करण्याचे स्वातंत्र्य दिले : बुमराह
By admin | Published: June 12, 2017 08:15 PM2017-06-12T20:15:37+5:302017-06-12T20:15:37+5:30
कर्णधार विराट कोहलीने मला मनाप्रमाणे गोलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य दिले
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 12 - कर्णधार विराट कोहलीने मला मनाप्रमाणे गोलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य दिले, अशी प्रतिक्रिया भारताचा नवा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराहने व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरल्यानंतर
पत्रकार परिषदेत बोलताना बुमराह म्हणाला, कर्णधाराचा आपल्यावर विश्वास आहे, हे बघितल्यानंतर चांगले वाटते. त्यामुळे नैसर्गिक खेळ करता येतो.
कर्णधाराच्या विश्वासामुळे माझ्यासारख्या युवा खेळाडूचा आत्मविश्वास उंचावतो आणि कामगिरीही सुधारते.
डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकण्यास माहिर असलेला बुमराह म्हणाला, आम्ही कुठल्या एका बाबीवर लक्ष केंद्रित करीत नाहीत. केवळ डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट किंवा केवळ स्विंग गोलंदाज असे वर्गगीकरण करता येणार नाही. ज्यावेळी तुमच्याकडे चेंडू सोपविण्यात त्यावेळी योगदान देणे आवश्यक असते. परिस्थितीनुसार गोलंदाजी करावी लागते. मग ते डेथ ओव्हर्स असो की सुरुवातीला असो. रणनीतीनुसार गोलंदाजी करणे आवश्यक असते. इंग्लंडमध्ये प्रथमच खेळत असलेल्या बुमराहने महेंद्रसिंग धोनी व कोहलीकडून टीप्स घेतल्या.
बुमराह म्हणाला, येथे खेळण्याचा अनुभव असलेल्या सीनिअर गोलंदाजांचा सल्ला घेतो. प्रशिक्षक कुंबळे, धोनी व विराट यांनी मला टिप्स दिल्या आहेत. त्याचा मला बराच लाभ झाला. बुमराहने पुढे सांगितले की,ह्यगोलंदाजांना येथील खेळपट्ट्यांकडून कुठलीच
मदत मिळत नाही. इंग्लंडमध्ये प्रथमच खेळत आहे. पण, येथे चेंडू बराच स्विंग होतो, असे मी एकले आहे, पण आतापर्यंत मला त्याचा अनुभव आला नाही. गोलंदाजांना येथे सातत्याने ताळमेळ साधावा लागत आहे.