विराटचा द्विशतकांचा ‘चौकार’! ब्रॅडमन, द्रविडचा विक्रम मोडला

By admin | Published: February 11, 2017 12:25 AM2017-02-11T00:25:59+5:302017-02-11T00:55:18+5:30

कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीच्या दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस पाडून दुहेरी शतकांचा ‘चौकार’ मारला.

Virat's double ton! Bradman breaks Dravid's record | विराटचा द्विशतकांचा ‘चौकार’! ब्रॅडमन, द्रविडचा विक्रम मोडला

विराटचा द्विशतकांचा ‘चौकार’! ब्रॅडमन, द्रविडचा विक्रम मोडला

Next

कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीच्या दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस पाडून दुहेरी शतकांचा ‘चौकार’ मारला. सलग चार कसोटी मालिकेत द्विशतके ठोकणारा
तो क्रिकेटविश्वातील पहिला फलंदाज बनला आहे. या मालिकेत त्याने
सर डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविडसारख्यांना मागे टाकले.

आकडेवारीनुसार, विराटने ब्रॅडमन यांना मागे टाकले खरे; मात्र १९३०-३१दरम्यान ब्रॅडमन यांची द्विशतके शानदार होती. १९३०च्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध २२ वर्षांच्या ब्रॅडमन यांनी लॉर्डस्वर २५४, लीड्सवर ३३४ व ओव्हलवर २३२ धावा केल्या. या सर्व धावा एकाच मालिकेतील आहेत.

जानेवारी १९३१मध्ये विंडीजविरुद्ध आॅस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत ब्रॅडमन यांनी ब्रिस्बेनमध्ये २२३ धावा केल्या. पुढच्या मालिकेत द. आफ्रिकेविरुद्ध पुन्हा २२६ धावा करीत सलग तीन मालिकांमध्ये द्विशतके झळकविणारे ते पहिले फलंदाज बनले होते.

राहुल द्रविडने सलगपणे द्विशतकांची हॅट्ट्रिक २००३-०४मध्ये पूर्ण केली. २००३च्या आॅक्टोबरमध्ये अहमदाबाद येथे २२२, अ‍ॅडिलेड येथे डिसेंबर २००३ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध २३३ आणि पुढच्या मालिकेत पाकविरुद्ध करिअरमधील सर्वोत्तम २७० धावांची खेळी केली होती.

कोहलीने वेस्ट इंडिज,
न्यू झीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध चार मालिकेत द्विशतके ठोकली.मागच्या वर्षी जुलैमध्ये नॉर्थ साऊंड येथे पहिले द्विशतक (२०० धावा) झळकविल्यानंतर आॅक्टोबरमध्ये न्यू झीलंडविरुद्ध २११ धावा केल्या. मुंबईत इंग्लंडविरुद्ध डिसेंबरमध्ये करिअरमधील सर्वोत्कृष्ट २३५ धावांची खेळीदेखील केली. आज बांगलादेशविरुद्ध विराटने २०४ धावा ठोकल्या.

टीमचाही विक्रम!
टीम इंडियाने उभारलेल्या ६ बाद ६८७ धावा हादेखील विश्वविक्रम आहे. सलग तीन कसोटींत कुठल्याही संघाने ६०० वर धावा उभारलेल्या नाहीत. भारताने इंग्लंडविरुद्ध मुंबई आणि चेन्नई येथे अनुक्रमे ६३१ आणि ७५९ असा धावांचा हिमालय उभारला होता.

Web Title: Virat's double ton! Bradman breaks Dravid's record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.