विराटचा ‘भावनिक’ सूर
By admin | Published: March 2, 2016 02:52 AM2016-03-02T02:52:28+5:302016-03-02T02:52:28+5:30
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारताचा स्टाइलिश फलंदाज विराट कोहलीने बांगलादेशमध्ये आयोजित कार्यक्रमात गायनाची झलक दाखविली.
ढाका : आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारताचा स्टाइलिश फलंदाज विराट कोहलीने बांगलादेशमध्ये आयोजित कार्यक्रमात गायनाची झलक दाखविली. जाहीर कार्यक्रमात त्याने जो वादा किया वो निभाना पडेगा. या गाण्याने त्याने मनातील भावना तर व्यक्त केली नाहीना ? अशी चर्चा सुरु झाली आहे.
आशिया चषक स्पर्धेत झालेल्या पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यात निर्णायक ४९ धावांची खेळी करुन भारताला विजयी केल्यानंतर भारतीय उच्चायुक्तांनी भारतीय संघाला ढाका येथे एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. यावेळी विराटने मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचे ‘जो वाद किया वो निभाना पडेगा’ हे गाणे गायले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बांगलादेशची एक गायिका करीत होती. त्यावेळी तीच्या सोबत स्टेजवर विराटला बोलावण्यात आले. यावेळी विराटने हे सदाबहार गाणे गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
विराट व त्याची मैत्रीण अनुष्का कोहली यांच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अपघाताने त्याच्या वाट्याला आलेल्या या गाण्यांच्या शब्दांना वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान भारताचा आक्रमक फलंदाज सुरेश रैना आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी देखील आपल्या गायकीची कला साद केली. दखल घेण्याची बाब म्हणजे काहीदिवसांपुर्वीच नव्याने येत असलेल्या ‘मेरठिया गँगस्टर’ चित्रपटातही रैनाने आपल्या गायकीची कला सादर केली आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ युवराजने शूट केला असून विराटने इंस्टाग्राम व फेसबुकवरही कार्यक्रमाचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. (वृत्तसंस्था)