विराटच्या पार्टीत विजय माल्ल्याला पाहताच टीम इंडिया झाली आऊट

By admin | Published: June 6, 2017 06:03 PM2017-06-06T18:03:17+5:302017-06-06T18:12:05+5:30

भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी लंडनमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विजय माल्ल्याने आपल्या पत्नीसह हजेरी लावली होती.

Virat's team looked at Vijay Mallya as the team went out to India | विराटच्या पार्टीत विजय माल्ल्याला पाहताच टीम इंडिया झाली आऊट

विराटच्या पार्टीत विजय माल्ल्याला पाहताच टीम इंडिया झाली आऊट

Next

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 6 - भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी लंडनमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विजय माल्ल्याने आपल्या पत्नीसह हजेरी लावली होती. बीसीसीआयचा एका उच्चपदस्थ पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित होता, माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, कर्णधार विराट कोहलीच्या संस्थेनं आयोजित केलेल्या एका चॅरिटी डिनरला माल्ल्या अचानक उपस्थित राहिला. विराट किंवा त्याच्या संस्थेनं मल्ल्याला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं नव्हतं. कार्यक्रमाशी संबंधित अन्य कोणीतरी त्याला बोलावलेलं असावं. पण विजय माल्ल्याच्या उपस्थितीमुळं टीम इंडियाचे खेळाडू अस्वस्थ झाले होते प्रत्येकजण त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होता. माल्लयाला तिथून जा असेही सांगता येत नव्हतं. त्यामुळे विराटसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनीच तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
विराटने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून जस्टिस एंड केयर ऑर्गनाइजेशनला फंड(पैसे) गोळा करणे हा मुख्य उद्देश होता. ही ऑर्गनाइजेशन मानवी तस्करी थांबवण्यासाठी प्रयत्न करते. या कार्यक्रमात कोच अनिल कुंबळे, माजी कर्णधार धोनी, युवराज, केदार जाधवसह इतर भारतीय खेळांडूनीही हजेरी लावली होती.
रविवारी बर्मिंगहॅममध्ये भारत - पाकिस्तानदरम्यान पार पडलेल्या हायव्होल्टेज सामन्यात विजय माल्ल्या बिनधास्तपणे व्हीआयपी सेक्शनमध्ये बसून भारतीय संघासाठी चिअर करत होता. त्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासोबतही विजय माल्ल्या चर्चा करताना दिसला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या माल्ल्याने यानंतर ट्विटरवरुन आपलं म्हणणं मांडलं. "भारत - पाकिस्तान सामन्यासाठी माझ्या उपस्थितीला मीडियाने खूप कव्हरेज दिला. भारतीय संघाला चिअर करण्यासाठी सगळ्या सामन्यांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे", असं सांगत माल्ल्याने आपण बिनधास्तपणे स्टेडिअममध्ये येऊन सामने पाहणार असल्याचं सांगत एकाप्रकारे आव्हानच देऊन टाकलं आहे.

दरम्यान, भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून माल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. एप्रिलमध्ये माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती त्यानंतर काही वेळातच त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली होती.
दिल्लीतील विशेष न्यायालयाने परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. 2016 मध्ये विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती.केंद्र सरकारने विजय मल्ल्याचा पासपोर्टही रद्द केला होता.याशिवाय त्याच्याविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्रही दाखल झाले आहे.

Web Title: Virat's team looked at Vijay Mallya as the team went out to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.