विराटच्या नाबाद शतकामुळे पहिल्या दिवसाचा खेळ २६७ वर थांबला

By Admin | Published: October 8, 2016 09:56 AM2016-10-08T09:56:35+5:302016-10-08T19:02:43+5:30

कर्णधार कोहलीचे शतक (१०२) व रहाणेच्या (७९) संयमी खेळीमुळे न्युझीलंडविरुद्धच्या तिस-या कसोटीत भारताने पहिल्या दिवशी ३ गडी गमावून २६७ धावा केल्या.

Virat's unbeaten century helped the first day's play to stop at 267 | विराटच्या नाबाद शतकामुळे पहिल्या दिवसाचा खेळ २६७ वर थांबला

विराटच्या नाबाद शतकामुळे पहिल्या दिवसाचा खेळ २६७ वर थांबला

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

इंदूर, दि. ८ -  कर्णधार कोहलीचे शतक (१०२) व रहाणेच्या (७९) संयमी खेळीमुळे न्युझीलंडविरुद्धच्या तिस-या कसोटीत भारताने पहिल्या दिवशी ३ गडी गमावून २६७ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीनेअजिंक्य रहाणेच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं हे एकूण तेरावं आणि न्यूझीलंडविरुद्धचं तिसरं शतक ठरलं आहे. कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला. पहिल्या दिवसाच्या अखेर भारताने 3 विकेट्स गमावत 267 धावा केल्या आहेत.
 
नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताला चौथ्या षटकातच मुरली विजयच्या रुपाने (१०) पहिला धक्का बसला. त्यानंतर गंभीर व चेतेश्वर पुजारा सेट झालेले असतानाचा २९ धावांवर खेळणार गंभीरही बाद झाला.  कर्णधार विराट कोहलीने  चेतेश्वर पूजाराच्या सहाय्याने डाव सावरला, मात्र पुजारा ४१ धावांवर खेळत असतानाच डावखुरा फिरकी गोलंदाज सँटनरने एका अप्रतिम चेंडूवर त्याला क्लीन बोल्ड केले.  न्युझीलंडतर्फे बोल्ट, पटेल व सँटनरने प्रत्येकी एक बळी टिपला. 
 
मालिकेत २-० अशी विजयी आघाडी असणा-या भारतीय संघाला क्लीनस्वीप विजय मिळवण्याची संधी आहे. सलग दोन विजयांमुळे पाकिस्तानला पिछाडीवर सोडत भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडच्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवता आले नाही. 
 
 

Web Title: Virat's unbeaten century helped the first day's play to stop at 267

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.