मालिका विजयाच्या षटकारासह विराटचा अनोखा विक्रम
By admin | Published: February 13, 2017 06:02 PM2017-02-13T18:02:24+5:302017-02-13T18:11:21+5:30
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकापोठापाठ सहा मालिका जिंकत मालिका विजयाचा षटकार लगावला आहे
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 13 - कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकापोठापाठ सहा मालिका जिंकत मालिका विजयाचा षटकार लगावला आहे. हैदराबाद येथे रंगलेल्या कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा दणदणीत पराभव केला. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज , न्यूझीलंड आणि इंग्लंड सारख्या तगड्या संघांना धूळ चारणाऱ्या भारतानं बांगलादेशची सहज पराभव करत कोसटीत आपणचं शेर असल्याचे दाखवलं. बांगलादेश विरुद्धच्या या विजयासह सलग सहा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे झाला आहे. बांगलादेश विरुद्धचा हा सामना विराटचा कर्णधार म्हणून 23 वा सामना होता. या सामन्यातील विजयानंतर त्याच्या नावावर विविध रेकॉर्ड झाले आहेत.
- 2015 पासून भारतीय संघ कसोटीच्या मैदानात अजिंक्य आहे. भारताने 2015 मध्ये श्रीलंकेला 2-1 ने हरवून, कसोटी मालिका विजयाला सुरुवात केली
- विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं सलग सहावी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला, पण विशेष म्हणजे विराट हा सर्वाधिक 19 कसोटी सामने अपराजित राहणारा भारताचा कर्णधारही ठरला.
(अश्विनने केली भज्जीच्या विक्रमाशी बरोबरी)
- याआधी हा विक्रम सुनील गावस्करांच्या नावावर होता. गावस्करांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कसोटी संघ 18 कसोटी सामने अपराजित होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 26 कसोटी सामने अपराजित राहण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या क्लाईव्ह लॉईडच्या नावावर आहे.
(भारताचा बांगलादेशवर 'विराट' विजय)
या यादीत रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या आणि विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलिया संघानं सलग 22 कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची कामगिरी बजावली आहे.ला.
(या दिवशी रिलीज होणार सचिनचा चित्रपट !)
- 23 कसोटीनंतर सर्वात यशस्वी कर्णधाराच्य़ा यादीत विराट अव्वल स्थानी आहे. धोनी, गांगुलीसारख्या माजी कर्णधारांना मागे टाकत विराट अग्रस्थानी विराजमान झाला आहे.
- विराटने नेतृत्व केलेल्या 23 कसोटी सामन्यांपैकी 15 कसोटी सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, सहा सामने अनिर्णत राखले आहेत. 23 सामन्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 14 विजय आणि तीन पराभव पत्करले होते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताला 23 सामन्यांत 10 विजय आणि 7 पराभव स्वीकारावे लागले होते.