वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरून कमावले 30 लाख रूपये
By Admin | Published: January 9, 2017 05:26 PM2017-01-09T17:26:11+5:302017-01-09T17:26:11+5:30
मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेहवाग आपल्या ट्विटमुळे आजकाल जास्तच चर्चेत असतो. आधी क्रिकेटचे मैदान गाजवणारा सेहवाग निवृत्तीनंतर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेहवाग आपल्या ट्विटमुळे आजकाल जास्तच चर्चेत असतो. आधी क्रिकेटचे मैदान गाजवणारा सेहवाग निवृत्तीनंतर सोशल मीडियावर चौकार षटकारांची आतषबाजी करत ऑनलाईन मैदान गाजवत आहे.
सध्या सेहवाग ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणा-या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याचे 80 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. सेहवाग नेहमीच मजेशीर ट्विट करत असतो आणि आपल्या हटके ट्विटसाठी नेहमीच चर्चेत असतो. मात्र याच ट्विटरने सेहवागला बक्कळ कमाईही करुन दिली आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग म्हणाला, मी सध्या समालोचनाचा पूर्ण आनंद घेत आहे. तसेच इंग्रजीमध्ये समालोचन करण्यासाठी स्वतःचं इंग्रजी सुधारण्यावरही काम करत आहे. मुलाखतीत सेहवागने ट्विटरवरील कमाईबाबतही सांगितलं. ट्विटरवर अॅक्टिव्ह असल्यामुळे गेल्या सहा महिन्यात मी 30 लाख रुपये कमावले आहेत, असं सेहवागने म्हटलं आहे.