विसाख एन. आर. संयुक्तपणे आघाडीवर

By admin | Published: June 9, 2016 04:44 AM2016-06-09T04:44:25+5:302016-06-09T04:44:25+5:30

विसाख एन. आर. याने तजाकिस्तानचा ग्रँडमास्टर अमोनातोव्ह फारुख याचा पराभव करुन नवव्या मुंबई महापौर खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत संयुक्तपणे अव्वल स्थानी झेप

Visakh N. R. Jointly leading | विसाख एन. आर. संयुक्तपणे आघाडीवर

विसाख एन. आर. संयुक्तपणे आघाडीवर

Next


मुंबई : तब्बल ५ तासांच्या मॅरेथॉन लढतीमध्ये भारताचा इंटरनॅशनल मास्टर विसाख एन. आर. याने तजाकिस्तानचा ग्रँडमास्टर अमोनातोव्ह फारुख याचा पराभव करुन नवव्या मुंबई महापौर खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत संयुक्तपणे अव्वल स्थानी झेप घेतली. ग्रँडमास्टर दिपतयान घोष याने आपली चमकदार कामगिरी कायम राखताना अग्रस्थान कायम राखले आहे.
वांद्रे येथील माऊंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत अमोनातोव्ह आणि विसाख यांच्यातील लढतीला राजाच्या इंडियन डिफेन्स पध्दतीने सुरुवात झाली. अटीतटीची झालेली ही लढत बघता बघता तब्बल ५ तासांपर्यंत रंगली. संथ सुरुवात झाल्यानंतर विसाखने घोड्याच्या जोरावर वर्चस्व राखले होते. यानंतर पारंपारिक आक्रमक खेळाच्या जोरावर काही मोहरे जिंकल्यानंतर त्याने अखेरच्या क्षणी अमोनातोव्हचा उंटासह दोन अधिक प्यादेही जिंकले. यानंतर जबरदस्त विसाखच्या प्याद्याने जबरदसत मुसंडी मारताना फारुखवर कमालीचे दडपण टाकले. यानंतर ५७ व्या चालीमध्ये फारुखने आपला पराभव मान्य केला.
त्याचवेळी, ग्रँडमास्टर दिपतयान आणि ग्रँडमास्टर ग्रचेव्ह बोरिस यांच्यातील लढत झटपट २७ चालींमध्ये बरोबरी सुटली. सिसिलियन पध्दतीने सुरुवात झालेल्या या लढतीत दोघांनीही सुरुवातीला सावध पवित्रा घेतला. यानंतर काही चालींमध्ये एकमेकांचा अंदाज घेतल्यानंतर दोघांनीही कोणताही अतिरीक्त धोका न पत्करता २७व्या चालीमध्ये बरोबरी मान्य केली. (क्रीडा प्रतिनिधी)
>जीएम ग्लेइझेरोव एवजेनी (रशिया) अनिर्णित गुसैन हिमल, जीएम लक्ष्मण आर. आर. अनिर्णित जीएम स्वप्नील धोपडे, आयएम विक्रमादित्य कुलकर्णी वि.वि. आयएम श्यामनिखील पी. आयएम गिरीश कौशिक वि.वि. प्रजेश आर.

Web Title: Visakh N. R. Jointly leading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.