पाकच्या अंध क्रिकेट संघाला मिळाला व्हिसा

By Admin | Published: January 26, 2017 01:08 AM2017-01-26T01:08:37+5:302017-01-26T01:08:37+5:30

पाकिस्तानच्या अंध क्रिकेट संघाला भारतीय उच्च आयोगाकडून विश्व टी-२० चॅम्पियनशिपसाठी व्हिसा जारी करण्यात आला, अशी मािहती

Visas to Pak blind cricket team | पाकच्या अंध क्रिकेट संघाला मिळाला व्हिसा

पाकच्या अंध क्रिकेट संघाला मिळाला व्हिसा

googlenewsNext

कराची : पाकिस्तानच्या अंध क्रिकेट संघाला भारतीय उच्च आयोगाकडून विश्व टी-२० चॅम्पियनशिपसाठी व्हिसा जारी करण्यात आला, अशी मािहती पाकिस्तान अंध क्रिकेट परिषदेने (पीबीसीसी) दिली. संघ आता विदेश आणि गृह मंत्रालयाच्या अनापत्ती पत्राची प्रतीक्षा करीत आहे.
आम्ही २८ जानेवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येण्याची योजना आखत आहोत; कारण ३१ जानेवारीपासून स्पर्धा सुरू होईल. आम्ही संबंधित सरकारी मंत्रालयाकडे भारत दौऱ्यावर जाण्यासाठी अर्ज केले आहेत, असे पीबीसीसीचे प्रमुख सय्यद सुल्तान शाह यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर भारतीय संघाला वर्षअखेर वनडे आणि टी-२० सामन्यांसाठी आमंत्रित करण्यावर संबंधित अधिकाऱ्यांशी बातचीत केली जाईल. आम्हाला व्हिसा जारी करण्यात आला यावर खूप खुशी आहे; कारण आम्ही चिंतेत होतो.
(वृत्तसंस्था)

Web Title: Visas to Pak blind cricket team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.