विष्णू वर्धनला दुहेरीचे विजेतेपद
By Admin | Published: July 3, 2016 04:26 AM2016-07-03T04:26:19+5:302016-07-03T04:26:19+5:30
भारताच्या विष्णू वर्धनने आपला फ्रान्सचा जोडीदार हुगो नाइससह आपल्या प्रतिस्पर्धी जोडीचा पराभव करून दहा हजार डॉलर्स पारितोषिकाच्या आयटीएफ पुरुष फ्युचर्स टेनिस स्पर्धेत
हरारे : भारताच्या विष्णू वर्धनने आपला फ्रान्सचा जोडीदार हुगो नाइससह आपल्या प्रतिस्पर्धी जोडीचा पराभव करून दहा हजार डॉलर्स पारितोषिकाच्या आयटीएफ पुरुष फ्युचर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकले.
अग्रमानांकित जोडी विष्णू व नाइस यांनी दक्षिण आफ्रिकेच्या टकर वोस्टर आणि निकोलास स्कोल्ट्ज
या दुसऱ्या मानांकित जोडीचा
अंतिम लढतीत ६४ मिनिटांत ६-४,
६-२ गुणांनी पराभव केला. विष्णू-नाइस जोडीने पहिल्या सर्व्हिसवर ७०.८, तर टकर-निकोलास जोडीने ५६.६ टक्केगुण संपादन केले. भारत-फ्रान्स जोडीने एकही डबल फॉल्ट केला नाही, तर दुसरीकडे टकर-निकोलास जोडीने तीन डबल फॉल्ट केले.
विष्णू-नाइस जोडीने पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये यकर-निकोलस जोडीची सर्व्हिस ब्रेक केली. विष्णू-नाइस जोडीने नंतर आपल्या खेळातील सातत्य कायम राखत दुसऱ्या सेटच्या पहिल्या आणि सातव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक करून विजेतेपद आपल्या नावावर केले. (वृत्तसंस्था)