लोकसभा सभापतींना फुटबॉल भेट
By Admin | Published: March 30, 2017 01:24 AM2017-03-30T01:24:34+5:302017-03-30T01:24:34+5:30
फिफाच्या १७ वर्षे आतील गटाच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोलकात्यात होणार आहे. याच्या आनंदात
नवी दिल्ली : फिफाच्या १७ वर्षे आतील गटाच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोलकात्यात होणार आहे. याच्या आनंदात भारताच्या फुटबॉल संघाचे माजी कर्णधार आणि तृणमुल काँग्रेसचे खासदार प्रसुन बॅनर्जी यांनी आज लोकसभेत सभापती सुमित्रा महाजन यांना एक फुटबॉल भेट दिला.
प्रख्यात माजी खेळाडू बॅनर्जी यांनी आज सकाळी बैठक सुरू होण्याआधी अध्यक्षांना फुटबॉल भेट दिला. यावेळी भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. अर्जुन पुरस्कार विजेता बॅनर्जी यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. तसेच लोकसभेचे सदस्य बनणारे ते पहिले व्यावसायीक फुटबॉलपटू आहेत.
फिफा १७ वर्षे आतील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोलकात्यातील साल्टलेक स्टेडिअममध्ये २८ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. हे मैदान युवा भारती क्रीडांगण म्हणून ओळखले जाते. भारतात पहिल्यांदा आयोजित केल्या जाणाऱ्या
या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने नवी मुंबई आणि गुवाहाटीत अयोजित केले जाणार आहेत. मंगळवारी क्रीडा मंत्री विजय गोयल हे देखील संसद परिसरात फुटबॉल घेउन पोहचले होते. (वृत्तसंस्था)