एका दिवसासाठी विश्वनाथन आनंदने गमावला अव्वल क्रमांक
By admin | Published: March 17, 2016 01:32 PM2016-03-17T13:32:07+5:302016-03-17T13:39:15+5:30
महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने एका दिवसासाठी भारताच्या बुद्धीबळ रँकींगमधलं अव्वलपद गमावत पुन्हा आपणच अव्वल असल्याचं सिद्ध केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मॉस्को, दि. १७ - महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने एका दिवसासाठी भारताच्या बुद्धीबळ रँकींगमधलं अव्वलपद गमावत पुन्हा आपणच अव्वल असल्याचं सिद्ध केलं आहे. 'कँडीडेट्स चेस चॅम्पिअन' स्पर्धेत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत झालेल्या लढतीतील पाचव्या फेरीत ड्रॉ झाल्याने विश्ननाथन आनंदने आपलं भारतातील अव्वल पद कायम ठेवलं आहे.
विश्वनाथनच्या खात्यात सध्या 2762 एलो रेटींग आहेत तर विश्वनाथला एका दिवसासाठी अव्वपदावरुन हटवणा-या पी हरिकृष्णच्या खात्यात 2758 एलो रेटींग आहेत. चौथ्या फेरीत झालेल्या पराभवामुळे विश्ननाथन आनंदच्या रेटींगमध्ये घसरण झाली होती. पराभवानंतर विश्वनाथन आनंदच्या एलो रेटींगमध्ये घसरण होऊन 2763 वर पोहोचला त्यामुळे 2763.3 एलो रेटींगसोबत हरिकृष्णने भारताच्या बुद्धीबळ रँकींगमधल्या अव्वलपदी झेप घेतली होती.