विश्वनाथन आनंदला जेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:04 AM2018-03-06T02:04:48+5:302018-03-06T02:04:48+5:30
विश्व रॅपिड विजेता भारताच्या विश्वनाथन आनंदने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत अंतिम फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफ्रेडविरुद्ध बरोबरी राखले आणि या जोरावर ताल स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.
मॉस्को - विश्व रॅपिड विजेता भारताच्या विश्वनाथन आनंदने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत अंतिम फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफ्रेडविरुद्ध बरोबरी राखले आणि या जोरावर ताल स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.
स्पर्धेत आनंदने एकूण नऊ फेºयांमध्ये सहा गुण संपादन केले. त्याने चार डावांमध्ये विजय, तर ४ डाव बरोबरीत सोडविले. आनंद तिसºया फेरीत अझरबैजानच्या शखरियार मामेदयारोव्हकडून पराभूत झाला होता. आनंदने इयान नेपोमनियाच्ची, अॅलेक्झांडर ग्रिसचुक, रशियाच्या हॉनिल दुबोल व अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा यांना नमविले. ग्रिसचुकविरुद्धची लढत आनंदसाठी महत्त्वपूर्ण ठरली. या विजयामुळे त्याचे जेतेपद निश्चित झाले. अव्वल दहा बुद्धिबळपटूंच्या राऊंड रॉबिन स्पर्धेत मामेदयारोव्ह, रशियाचा सरगेई कारजाकिन व नाकामुरा हे पाच गुणांसह संयुक्तपणे दुसºया क्रमांकावर राहिले. दुबोव्ह आणि रशियाचा ब्लादिमीर क्रॅमनिक यांनी प्रत्येकी चार गुण संपादन केले. रशियाचा पिटर स्विडलर आणि नेपोमनियाच्ची ही जोडी नवव्या क्रमांकावर राहिली. आनंदने दोन महिन्यांपूर्वी रियाधमध्ये जागतिक जलद विजेतेपद संपादन केले होते. विश्वनाथन आनंद आता ब्लिट्झ स्पर्धेत जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने सहभागी होईल. (वृत्तसंस्था)