विश्वनाथन आनंदचा कार्लसनला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:35 IST2017-12-29T00:33:53+5:302017-12-29T00:35:13+5:30
नवी दिल्ली : भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने वर्ल्ड रॅपिड चेस स्पर्धेच्या नवव्या फेरीत जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन याला पराभवाचा धक्का दिला.

विश्वनाथन आनंदचा कार्लसनला धक्का
नवी दिल्ली : भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने वर्ल्ड रॅपिड चेस स्पर्धेच्या नवव्या फेरीत जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन याला पराभवाचा धक्का दिला. सौदी अरब येथील रियाध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आनंदने भारतीय बचावमध्ये बोटविननिक पद्धतीने खेळ करत बाजी मारली. काळ्या मोहºयांनी खेळताना आनंदने ३४ चालींमध्ये विजय मिळवला.
संपूर्ण लढतीवर वर्चस्व मिळवलेल्या आनंदने वझीर आणि उंट यांच्या जोरावर कार्लसनला दबावाखाली आणले. या विजयानंतर आनंदने स्पर्धेत व्लादिमीर क्रॅमनिक आणि वाँग वेलेंटिना यांच्यासह आघाडी मिळवली आहे. (वृत्तसंस्था)