विश्वनाथन आनंदचे तिसऱ्या स्थानी समाधान

By admin | Published: November 3, 2015 01:49 AM2015-11-03T01:49:16+5:302015-11-03T01:49:16+5:30

माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने बिलबाओ मास्टर्स फायनल बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या व अखेरच्या फेरीत चीनच्या लीरेन डिंगविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. यासह त्याला

Viswanathan Anand's third place solution | विश्वनाथन आनंदचे तिसऱ्या स्थानी समाधान

विश्वनाथन आनंदचे तिसऱ्या स्थानी समाधान

Next

बिलबाओ : माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने बिलबाओ मास्टर्स फायनल बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या व अखेरच्या फेरीत चीनच्या लीरेन डिंगविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. यासह त्याला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
चार खेळाडूंत झालेल्या या डबल राऊंड रॉबिन स्पर्धेत आनंदने पाच डाव बरोबरीत खेळले आणि एका फेरीत त्याला पराभव पत्करावा लागला. अशा प्रकारे सलग दुसऱ्या स्पर्धेत भारतीय खेळाडू एकही डाव जिंकण्यात यशस्वी ठरला नाही.
अमेरिकेच्या वेस्ली सो याने नेदरलँडच्या अनीस गिरीचा टायब्रेक ब्लिट्जमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकावले. याआधी अव्वलस्थानी राहिलेल्या या दोन्ही खेळाडूंनी सहावी फेरी ड्रॉ खेळली होती. वेस्ली आणि गिरी यांचे समान आठ गुण झाले, तर आनंद आणि डिंग हे प्रत्येकी ५ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिले.
विजय मिळवल्यानंतर तीन आणि ड्रॉ राहिल्यास एक गुण अशी फुटबॉलसारख्या स्कोअरिंग प्रणालीच्या नंतरही या स्पर्धेत अधिक फेऱ्यांत निकाल निघू शकले नाहीत. एका फेरीत गिरीने आनंदला पराभूत केले, तर दुसऱ्या लढतीत वेस्लीने डिंगवर विजय मिळवला. एकूण १२ पैकी १0 फेऱ्या ड्रॉ राहिल्या. (वृत्तसंस्था)

Web Title: Viswanathan Anand's third place solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.