मॅक्युलमनं मोडला विव्ह रिचर्डचा विक्रम, 54 चेंडूत 100
By admin | Published: February 20, 2016 08:49 AM2016-02-20T08:49:15+5:302016-02-20T08:49:15+5:30
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत मॅकयुलमने अवघ्या 54 चेंडूंमध्ये शतक झळकावले आहे. कारकिर्दीतलं बारावं शतक झळकावताना मॅक्युलमने 16 चौकार व 4 षटकार फटकावले.
Next
>ऑनलाइन लोकमत
ख्राइस्टचर्च (न्यूझीलंड), दि. 20 - न्यूझीलंडचा कप्तान ब्रँडन मॅक्युलमने कसोटी क्रिकेटमधल्या वेगवान शतकाचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत मॅकयुलमने अवघ्या 54 चेंडूंमध्ये शतक झळकावले आहे. कारकिर्दीतलं बारावं शतक झळकावताना मॅक्युलमने 16 चौकार व 4 षटकार फटकावले.
याआधीचा विक्रम विवियन रिचर्ड व मिसबाह उल हकच्या नावावर होता. रिचर्डने इंग्लंडविरुद्ध अँटिग्वामध्ये खेळताना तर मिसबाहने ऑस्ट्रेलिविरुद्ध अबुधाबीमध्य खेळताना 56 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. मॅक्युलमचं आज नशीबही जोरावर होतं, कारण तो 39 वर असताना मिशेल मार्चने सूर मारत एक अफलातून झेल घेत त्याला बाद केलं होतं. परंतु, नंतर रिप्लेमध्ये तो नो बॉल असल्याचं निष्पन्न झालं.
मॅक्युलमची ही 101वी व शेवटची कसोटी असून ती तो टी-20 सारखी खेळत आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला असून त्याने 101 षटकार आत्तापर्यंत मारले आहेत. हा विक्रम याआधी 100 षटकार मारणा-या अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता.