बीसीसीआयच्या निर्णयाची ग्रामीण लीगला प्रतीक्षा
By admin | Published: April 6, 2015 03:05 AM2015-04-06T03:05:18+5:302015-04-06T03:05:18+5:30
ग्रामीण विभागातील दुर्गम भागात असलेल्या प्रतिभावान क्रिकेटपटूंना शोधण्यासाठी ‘इंडियन ग्रामीण क्रिकेट लीग’ (आयजीसीएल) प्रारंभ करणारे अनुराग
लखनौ : ग्रामीण विभागातील दुर्गम भागात असलेल्या प्रतिभावान क्रिकेटपटूंना शोधण्यासाठी ‘इंडियन ग्रामीण क्रिकेट लीग’ (आयजीसीएल) प्रारंभ करणारे अनुराग भदोरिया यांनी ही लीग सकारात्मक उद्देशाने सुरू करण्यात आली असल्याचे स्पष्ट करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) एक दिवस या लीगला मान्यता मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
भदोरिया म्हणाले, की दुर्गम भागातील प्रतिभावान क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी आम्ही गावांमध्ये आयजीसीएलतर्फे स्पर्धांचे आयोजन करतो. जिल्हाच्या ठिकाणी आम्ही स्पर्धेचे आयोजन करतो. त्यात विविध भागांतील अनेक गावांचे संघ सहभागी होतात. या लीग स्पर्धेला सोमवारपासून लखनौमध्ये प्रारंभ होणार आहे. बीसीसीआयकडून मान्यता मिळेल का, यावर भदोरिया म्हणाले, आम्ही आपल्या मेहनतीच्या जोरावर बीसीसीआयला मान्यता प्रदान करण्यास बाध्य करू. आता ही केवळ सुरुवात आहे, मात्र आम्हाला यश मिळेल. (वृत्तसंस्था)