मेरीच्या सुवर्ण ठोश्याची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 11:44 PM2019-10-02T23:44:32+5:302019-10-02T23:44:53+5:30
या स्पर्धेचे यजमानपद भूषवताना मेरीकोम व सरिता यांच्या सुवर्णपदकांसह एकूण आठ पदके पटकावली होती.
उलान उदे (रशिया) : विश्वविक्रमी सहा वेळा विश्वविजेती होण्याचा मान मिळवणारी मेरीकोम आपल्या अनुभवाच्या जोरावर गुरुवारपासून येथे सुरु होत असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदकाची दावेदार राहील. त्याचवेळी या स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंकडूनही पदकाची आशा आहे. भारताने या स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी २००६ मध्ये केली होती. त्यावेळी या स्पर्धेचे यजमानपद भूषवताना मेरीकोम व सरिता यांच्या सुवर्णपदकांसह एकूण आठ पदके पटकावली होती. मेरीकोमला ५१ किलो वजनगटात विश्वविजेतेपद पटकावता आलेले नाही. ती यावेळी हे जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे.
मेरीकोमने ५१ किलो वजन गटात कडव्या स्पर्धेनंतरही आॅलिम्पिकमध्ये कांस्य व आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. माजी चॅम्पिनय एल. सरिता देवीवरही (६० किलो) सर्वांची नजर राहील. तिने चाचणी स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत गेल्या वेळची कांस्य विजेती व तिच्या तुलनेत अधिक युवा सिमरनजित कौरचा पराभव केला होता. इंडिया ओपनची सुवर्ण विजेती नीरज (५७ किलो) व जमुना बोरो (५४) यांचा स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या पाच बॉक्सर्समध्ये समावेश आहे.