चहलने शेतात घेतले गोलंदाजीचे धडे !

By Admin | Published: February 7, 2017 08:13 PM2017-02-07T20:13:08+5:302017-02-07T20:13:08+5:30

हरियाणातील जिंद या लहान गावातून आलेला २६ वर्षांचा यजुवेंद्र चहल

Walking lessons in the field! | चहलने शेतात घेतले गोलंदाजीचे धडे !

चहलने शेतात घेतले गोलंदाजीचे धडे !

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - हरियाणातील जिंद या लहान गावातून आलेला २६ वर्षांचा यजुवेंद्र चहल. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच आटोपलेल्या मालिकेत पहिल्यांदा मालिकावीराचा किताब जिंकणारा लेगब्रेक गोलंदाज! चहलच्या गोलंदाजीची सुरुवात शेतातून झाली. शेतात गोलंदाजीचा सराव करीत-करीत तो थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरला. यजुवेंद्र १० वर्षांचा असताना वडील केके चहल यांनी स्वत:च्या शेतात खेळपट्टी बनविली होती. या खेळपट्टीवर सातत्याने सराव करीत मुलगा भारतीय संघात पोहोचला. क्रिकेट आणि बुद्धिबळ हे यजुवेंद्रचे आवडते खेळ. त्याने क्रिकेटमध्ये चमकण्याआधी १२ वर्षे गटाच्या विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेट आणि बुद्धिबळात देशाचे प्रतिनिधित्व करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

यजुवेंद्रच्या मते देशासाठी खेळत असताना पैसा तर कमविता येतोच शिवाय लोकप्रियता देखील लाभते. चाहते आपल्याला सेलेब्रिटी समजतात. माझ्यासोबत हेच घडत आहे. इंग्लंडविरुद्ध बेंगळुरू टी-२०त २५ धावांत ६ बळी घेताच यजुवेंद्र चर्चेत आला. त्याचे वन डे आणि टी-२० पदार्पण तसे मागच्या मोसमात झाले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने मात्र त्याला नवी ओळख दिली.
क्रिकेटमध्ये बुद्धिबळाची चाल खेळणारा खेळाडू अशी चहलची दुसरी ओळख आहे.

अश्विन आणि जडेजा यांच्या अनुपस्थितीत संधीचे सोने करणाऱ्या चहलने सरावादरम्यान धोनी आणि विराट कोहली या दोघांचीही मने जिंकली. विशेषत: माहीने कुठल्या विकेटवर कसा चेंडू टाकावा आणि फलंदाजाचा कमकुवतपणा काय आहे, हे सांगून माझ्या यशात मोलाचा वाटा उचलल्याचे चहलला वाटते. माझ्या चेंडूवर चौकार- षटकार लागला तरी विराटने कधीही माझ्यावर दडपण आणले नाही. उलट जसा मारा करायचा असेल तसा तू बिनधास्तपणे कर, असे विराट म्हणायचा. कोच अनिल कुंबळे यांच्यासोबत बसून गोलंदाजीत सुधारणा केली.
लग्न आईवडिलांच्या मर्जीनुसार!
युवा यजुवेंद्रने अन्य युवकांसारखीच आयुष्याची योजना आखली आहे. तो म्हणतो, मीडियाने कुठल्या तरी मॉडेल किंवा हिरोईनसोबत माझे नाव जोडण्याआधी लग्नाबाबतची कॉन्सेप्ट स्पष्ट आहे. लग्न मी घरच्यांच्या मर्जीनुसारच करणार आहे. आईवडील म्हणतील त्या मुलीला पत्नी बनवेन!

Web Title: Walking lessons in the field!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.