वॉर्नला अ‍ॅनाकोंडाने केला दंश

By admin | Published: February 19, 2016 02:52 AM2016-02-19T02:52:50+5:302016-02-19T02:52:50+5:30

आॅस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याला एका रियालिटी टीव्ही शोमध्ये साहस करणे चांगलेच महागात पडले. या टीव्ही शोदरम्यान त्याला अ‍ॅनाकोंडा सापाने दंश केला.

Warna Anaconda did the bite | वॉर्नला अ‍ॅनाकोंडाने केला दंश

वॉर्नला अ‍ॅनाकोंडाने केला दंश

Next

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याला एका रियालिटी टीव्ही शोमध्ये साहस करणे चांगलेच महागात पडले. या टीव्ही शोदरम्यान त्याला अ‍ॅनाकोंडा सापाने दंश केला.
न्यूज डॉटकॉम एयूच्या रिपोर्टनुसार ‘आय अ‍ॅम ए सेलिब्रिटी... गेट मी आऊट आॅफ हिअर’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेन वॉर्नला अ‍ॅनाकोंडाने दंश केला. आफ्रिकन बेडूक, विंचू, झुरळ आणि उंदराने भरलेल्या बॉक्समधून बहादुरीने निघालेल्या शेनला सापांचा बॉक्स देण्यात आला. हा बॉक्स देण्याआधी यजमान डॉक्टर ख्रिस ब्राऊन यांनी वॉर्नला, त्याच्या त्वचेला उंदरांचा वास येत आहे आणि साप त्याला आपला आहार समजू शकतो, असा इशाराही दिला होता.
शेन वॉर्न याने त्याचे डोके त्या बॉक्समध्ये घातले न घातले तोच अ‍ॅनाकोंडाने त्याला दंश केला. त्यानंतर वॉर्नवर उपचार करण्यात आले.
विशेष म्हणजे, शेन वॉर्न याने आधीच सर्वांत जास्त भीती सापाची वाटते, असे कार्यक्रमाचे कार्यकारी निर्माता स्टीफन टेटे यांना सांगितले होते. सापाने दंश केल्यानंतरही वॉर्नने
त्याचे टास्क पूर्ण केले. या बॉक्समध्ये अ‍ॅनाकोंडा, कार्न स्नेक आणि रॅट
स्नेक होते. वॉर्नला दंश केलेला अ‍ॅनाकोंडा जास्त विषारी नव्हता;
परंतु त्याचे दात खूप तीक्ष्ण
आणि टोकदार होते. त्याने दंश केल्यानंतर १०० सुया टोचल्याएवढा त्रास होतो.(वृत्तसंस्था)

Web Title: Warna Anaconda did the bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.