वॉर्नरच्या वादळात कोलकात्याचा धुव्वा!
By admin | Published: May 1, 2017 12:21 AM2017-05-01T00:21:20+5:302017-05-01T00:52:15+5:30
डेव्हिड वॉर्नरच्या वादळी शतकीसमोर आज जबदरस्त फॉर्मममध्ये असलेल्या कोलकाता नाइटरायडर्सचा धुव्वा उडाला.
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 1 - डेव्हिड वॉर्नरच्या वादळी शतकासमोर आज जबदरस्त फॉर्मममध्ये असलेल्या कोलकाता नाइटरायडर्सचा धुव्वा उडाला. हैदराबादने दिलेल्या 210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाइटरायडर्सला 48 धावांनी पराभव पत्करावा लागला.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला चांगली सुरुवात मिळाली नाही. नारायण केवळ एक धाव काढून बाद झाला. तर कर्णधार गौतम गंभीर 11 धावा काढून डग आउटमध्ये परतला. दोन खंदे फलंदाज बाद झाल्याने नाइटरायडर्सची फलंदाजी कोलमडली. दरम्यान, सामन्यात पावसाचा व्यत्ययही आला.
पाऊस थांबल्यानंतर रॉबिन उथप्पाने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. पण मनीष पांडे 39 आणि उथप्पा 53 धावा काढून बाद झाल्यानंतर कोलकात्याचा प्रतिकार संपुष्टात आला. अखेर त्यांना 20 षटकात 7 बाद 161 धावांपर्यंतच मजल मारता आली नाही.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय कोलकाता नाइटरायडर्सच्या अंगाशी आला. डेव्हिड वॉर्नरने तुफानी फटकेबाजी करत कोलकात्याचा गोलंदाजांची धुलाई केली. 129 धावांची शानदार शतकी खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने शिखर धवनसोबत शतकी सलामी देत हैदराबादला भक्कम पायाभरणी करून दिली.
दरम्यान धवन 29 धावा काढून बाद झाला. त्यानंतर वॉर्नरही 59 चेंडूत 129 धावा काढून बाद झाला. वॉर्नरने या खेळीत 10 चौकार आणि 8 षटकार ठोकले. अखेरच्या काही षटकांमध्ये हैदराबादला म्हणावी तशी फटकेबाजी करता आली नाही. विल्यम्सन (40) आणि युवराज सिंग (नाबाद 6) यांना फारशी मोकळीक न मिळाल्याने हैदराबादला 20 षटकात 3 बाद 209 धावाच करता आल्या.