वॉर्नर, गेल, पोलार्ड आणि धोनीला बदलावी लागणार "बॅट"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:01 PM2017-07-19T12:01:16+5:302017-07-19T17:37:58+5:30

डेविड वॉर्नर, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखले जातात.

Warner, Gayle, Pollard and Dhoni to replace "Bat" | वॉर्नर, गेल, पोलार्ड आणि धोनीला बदलावी लागणार "बॅट"

वॉर्नर, गेल, पोलार्ड आणि धोनीला बदलावी लागणार "बॅट"

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 19 - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखले जातात. आपल्या आक्रमक फटकेबाजीने ते प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पिसे काढतात. स्टेडियममध्ये लांबपर्यंत चेंडू भिरकावण्याची त्यांच्या फलंदाजीमध्ये क्षमता आहे. हे सर्व फलंदाज आतापर्यंत ज्या बॅटने उत्तुंग फटकेबाजी करायचे ती बॅट त्यांना लवकरच बदलावी लागणार आहे. 
 
या फलंदाजांच्या बॅटच्या कडा जाडजूड आहेत. मेरिलबोर्न क्रिकेट क्लब म्हणजे एमसीसीच्या नव्या  मार्गदर्शकतत्वांनुसार बॅटची कडा ही 40 मिलीमीटरपेक्षा कमी असली पाहिजे. या सर्व फलंदाजांच्या बॅटच्या कडेची जाडी जास्त असल्याने त्यांना बॅट बदलावी लागणार आहे. यावर्षी मार्च महिन्यात एमसीसीने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.  
 
आणखी वाचा 
एम.एस.धोनी ! जाणून घ्या माहीच्या या खास गोष्टी
धोनी आणि युवराजच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आलीय - राहुल द्रविड
VIDEO - धोनी नसता तर, शामीने पाकिस्तानी चाहत्याला दाखवला असता बाप
 
कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्स, ऑस्ट्रेलियाच स्टिव्ह स्मिथ, इंग्लंडचा ज्यो रुट यांच्या बॅटची कडा 40 मिलीमीटरपेक्षा कमी असल्याने त्यांना बॅट बदलण्याची आवश्यकता नाही. ऑस्ट्रेलिया वॉर्नर, वेस्ट इंडिजचा गेल, पोलार्ड यांच्या बॅटची कडा 50 मिलीमीटर आहे त्यामुळे त्यांना सहज चौफेर फटकेबाजी करणे शक्य होते. भारताच्या विद्यमान संघात फक्त धोनीच्या बॅटची कडा 45 मिलीमीटर आहे. 
 
पोलार्डने आधीच आपली बॅट बदलली आहे. आयपीएलमध्ये पत्रकारांशी बोलताना त्याने ही माहिती दिली. ऑक्टोंबरपर्यंत उगाच थांबण्यात काही अर्थ नाही असे त्याने सांगितले. ऑक्टोंबरपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु होणार आहे. विद्यमान भारतीय संघात फक्त धोनीच सर्वात वजनदार बॅट वापरतो. 1250 ग्रॅम ते 1300 ग्रॅम त्याच्या बॅटचे वजन आहे. 
 
...म्हणून एमसीसीकडे क्रिकेटचे नियम बनवण्याचे अधिकार
 
येत्या 1 ऑक्टोंबर 2017 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवे नियम लागू होणार आहेत.  मेरिलबोर्न क्रिकेट क्लब म्हणजे एमसीसीने हे नवीन नियम बनवले आहेत. क्रिकेटचे संचालन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असताना एमसीसी कसे काय नियम बनवू शकते ? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडू शकतो. 
खरतर एमसीसीची स्थापना 1787 साली झाली. 1788 पासून एमसीसीने क्रिकेटचे नियम बनवण्याची जबाबदारी स्वीकारली. एमसीसीने बनवलेल्या नियमांना आयसीसीची मान्यता आवश्यक असली तरी, क्रिकेटचे नियम बनवण्याचे सर्वाधिकार (कॉपीराईट) मात्र एमसीसीकडे आहेत. 1993 साली एमसीसीने आयसीसीकडे क्रिकेटचे प्रशासकीय आणि संचालनाचे अधिकार हस्तांतरीत केले. यापूर्वी 2015 मध्ये एमसीसीने क्रिकेटचे नियम बनवले होते. 2017 पासून नवीन नियम लागू होतील. 
 
धोनी म्हणतो, मी आहे जुन्या मद्याप्रमाणे !
महेंद्रसिंह धोनी स्वतःला एखाद्या जुन्या मद्याप्रमाणे मानतो, ज्याची चव वेळेसोबत अधिकाधिक उत्तम होत जाते,  असे त्यानं स्वतः म्हटले आहे.  भारताने तिस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करत सीरिजमध्ये 2-0 ची आघाडी घेतली. भारताने 93 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला. भारताच्या या विजयात महत्वाचा वाटा उचलला तो महेंद्रसिंग धोनीने.
 

Web Title: Warner, Gayle, Pollard and Dhoni to replace "Bat"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.