धरमशालामध्ये वॉर्नरच्या कामगिरीबाबत उत्सुकता
By admin | Published: March 24, 2017 11:40 PM2017-03-24T23:40:34+5:302017-03-24T23:40:34+5:30
आॅस्ट्रेलियाचा विचार करता कसोटी मालिका संपण्यासाठी केवळ पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. काही जाणकारांच्या मते वेगवान गोलंदाजांना अनुकूल
आॅस्ट्रेलियाचा विचार करता कसोटी मालिका संपण्यासाठी केवळ पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. काही जाणकारांच्या मते वेगवान गोलंदाजांना अनुकूल धरमशाला येथील परिस्थितीमुळे सामन्याचा निकाल चार दिवसांत लागेल. वेगवान गोलंदाजांना सहायक असलेल्या वातावरणामुळे फिरकीपटूंना थोडी विश्रांती मिळेल, अशी आशा आहे. दोन तुल्यबळ संघांदरम्यानच्या वर्चस्वाच्या लढाईमुळे हिमालयालाही हादरे बसतील, असे मत व्यक्त होत आहे.
या मालिकेत आॅस्ट्रेलियाने सर्वतोपरी चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला. त्यात मग फलंदाज असो, फिरकीपटू असो की वेगवान गोलंदाजा असो. मायदेशात खेळण्याचा विचार करता भारताला लाभ मिळण्याची शक्यता आहे, पण तरी यजमान संघ दावेदार नाही. मायदेशात खेळतानाही भारतीय संघ दडपणाखाली असल्याचे दिसले. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आॅस्ट्रेलिया संघ या मालिकेत स्वत:चा स्तर उंचावण्यात यशस्वी ठरला.
आॅस्ट्रेलिया या मालिकेत विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर असेल तर त्याचे सर्व श्रेय त्यांच्या फलंदाजांना जाते. आघाडीच्या व तळाच्या फलंदाजांदरम्यान रेनशॉ व हँडसकोंब यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. जीवनात केवळ फिरकीपटूंनाच खेळत असल्याप्रमाणे ते या मालिकेत फिरकी गोलंदाजी सहजपणे खेळत आहेत. वळणाऱ्या चेंडूवर प्रतीक्षा करीत ते सहजपणे खेळण्यात यशस्वी ठरले आहेत. स्टीव्ह स्मिथ व शॉन मार्श चांगले खेळाडू आहेत, पण या खेळपट्टीवर डेव्हिड वॉर्नरच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहणार आहे. त्याला या दौऱ्यात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
भारताला या लढतीत सुरुवातीपासून आक्रमक खेळ करावा लागेल. विशेषत: वेगवान गोलंदाजांना आपल्या वेगाने आॅस्ट्रेलियन फलंदाजांना चकित करावे लागेल. कुठलेही दडपण न बाळगता त्यांना खेळावे लागेल. परिस्थिती शमी व भुवीसाठी उपयुक्त असेल तर भारतीय संघात पाच गोलंदाजांचाही समावेश राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
क्रीडा पानावर विराट कोहलीला खेळातील डोनाल्ड ट्रम्प असल्याचे संबोधणारे वृत्त मला पचनी पडले नाही. अशा वृत्तामुळे आॅस्ट्रेलियाच्या कृष्णकृत्यांना आणखी नवे व्यासपीठ मिळणार आहे. (पीएमजी)
क्रिकेट आॅस्ट्रेलिया आणि क्रिकेट जगतही या बाबीचे हकदार नाही, हे मात्र खरे. (टीसीएम) - रवी शास्त्री