वाशिमचा नारायण सुपर रॉदिनर
By admin | Published: February 20, 2017 04:42 PM2017-02-20T16:42:31+5:302017-02-20T16:44:42+5:30
फ्रान्सच्या धरतीवर आधारित ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेमध्ये नोव्हेबर ते नोव्हेबर या एका वर्षात १२ तासात ठरलेल्या
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 20 - फ्रान्सच्या धरतीवर आधारित ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेमध्ये नोव्हेबर ते नोव्हेबर या एका वर्षात १२ तासात ठरलेल्या कि.मि.नुसार प्रवास करणाऱ्या सायकलपटूला सुपर रॉदिनर हा बहुमान दिला जातो. हा बहुमान वाशिमच्या नारायणाने मिळविला आहे. सुपर रॉदिनर हा सायाकिंगच्या जगातील बहुमान प्राप्त करणारा वाशिम जिल्ह्यातील पहिला सायकल पटू नारायण व्यास ठरला आहे.
फ्रान्सच्या धरतीवर आधारित ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेमध्ये नोव्हेबर ते नोव्हेबर या एका वर्षात १२ तासात २०० कि.मी, २० तासात ३०० कि.मी., २७ तासात ४०० कि.मी. व ४० तासात ६०० कि.मी. सायकल ने पूर्ण करण्याऱ्या सायकल पटूला ह्यसुपर रॉदिनर हा बहुमान दिल्या जातो. फ्रांस देशातील या स्पर्धेला नागपूरकरांनी चांगलाच प्रतीसाद दिला आहे. मागील एका वर्षात वाशीमच्या सायकल स्वार ग्रुपने या स्पर्धेत भाग घेऊन वाशीमचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. या ग्रुपचा सदस्य नारायण व्यास याने २००,३००,४००, कि.मी. च्या स्पर्धा दिलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण केल्या आहे. या स्पर्धेनंतर ६०० कि.मी. साठी १८ फ्रेब्रूवारीला सकाळी ५ वाजता त्याने नागपूरच्या झिरोमाईलपासून सुरुवात करून जबलपूर (मध्यप्रदेश) जवळील हुल्की या गावापर्यंत ३०० कि.मी. सायकलिंग करून पुन्हा ३००.कि.मी. झिरोमाईल (नागपूर) येथे परतायचे होते.असा ६०० कि.मी. चा ४० तासाचा प्रवास ३६ तासात पूर्ण करून नारायण व्यास यांनी सुपर रॉदिनर हा सायाकिंगच्या जगातील बहुमान प्राप्त केला आहे. १८ स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता .
या स्पर्धेत ४८० किलोमीटरचे अंतर पार केल्यावर छिंन्दवाडा व शिवनी बायपास जवळील स्पीड ब्रेकरमुळे सायकल वरील नियंत्रण सुटल्यामुळे सकाळी ५ वाजताच्या दरम्यात त्याचा अपघात होऊन डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले व डाव्या पायाला सुद्धा मार लागला. आपली सायकल एका धाब्यावर ठेऊन तो १५ कि.मी. जवळच्या गावातील दवाखान्यात उपचारासाठी गेला.तेथील डॉकटरांनी उपचार करून त्याला दवाखान्यात भरती होण्यास सांगितले. मात्र तो दवाखान्यात भरती न होता उरलेले १२० कि.मी चे अंतर पूर्ण करण्यासाठी रवाना झाला. झीरोमाईल केवळ ७ कि.मी. राहले असतांना त्याची सायकल पंक्चर झाली. जवळच सायकल दुरुस्तीचे दुकान पाहून त्यांनी पुन्हा प्रवास सुरु केला व १९ फ्रेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता त्यांनी आपली स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून वाशीमकरांना शिवजयंतीची भेट दिली.
यानंतर डेक्केन क्लीफ्फहॅन्गर (पुणे ते गोवा) असे ६४२ कि.मी. अंतर ३२ तासात पूर्ण करून रॅम ( रेस अॅक्रॉस अमेरिका ४८०० कि.मी. १२ दिवस) साठी तो प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले.