PV Sindhu Dance : ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूचा डान्स, सूर्यकुमार यादवसह अडीच लाख लोकांनी केलं लाईक्स, Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 21:29 IST2022-07-03T21:28:44+5:302022-07-03T21:29:16+5:30
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने शनिवारी सोशल मीडियावर तिचा डान्सिंग व्हिडीओ पोस्ट केला.

PV Sindhu Dance : ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूचा डान्स, सूर्यकुमार यादवसह अडीच लाख लोकांनी केलं लाईक्स, Video
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने शनिवारी सोशल मीडियावर तिचा डान्सिंग व्हिडीओ पोस्ट केला. दोन ऑलिम्पिक पदकं नावावर असलेल्या सिंधूचा हा व्हिडीओ क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याच्यासह जवळपास अडीच लाख लोकांनी लाईक्स केला आहे. त्यावर तिने लिहिले आहे की, जे करून तुम्हाला आनंद मिळतो, ते करा!
सिंधूने या व्हिडीओत 'Head Shoulders Knees and Toes' आणि 'Gomi Gomi' या दोन गाण्यांवर डान्स केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या मलेशिया ओपन सुपर ७५० स्पर्धेत सिंधूला उपांत्यपूर्व पेरीत चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून हार पत्करावी लागली. या स्पर्धेतील भारताचे आव्हान एचएस प्रणॉय याच्या पराभवासह संपुष्टात आले आहे. इंडोनेशियाच्या जॉनथन ख्रिस्टीने २१-१८, २१-१६ अशा अवघ्या ४४ मिनिटांत त्याचा पराभव केला.