अॅशेस जिंकण्यासाठी उतरणार - वॉटसन
By admin | Published: May 23, 2015 01:08 AM2015-05-23T01:08:34+5:302015-05-23T01:08:34+5:30
इंग्लंडमध्ये गेल्या पंधरा वर्षांत एकही अॅशेस मालिका जिंकण्यात आॅस्ट्रेलियाला अपयश आले आहे. ही मालिका खंडित करण्याच्या हेतूनेच संघ मैदानात उतरेल,
सिडनी : इंग्लंडमध्ये गेल्या पंधरा वर्षांत एकही अॅशेस मालिका जिंकण्यात आॅस्ट्रेलियाला अपयश आले आहे. ही मालिका खंडित करण्याच्या हेतूनेच संघ मैदानात उतरेल, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सन याने दिली आहे.
येत्या ८ जुलैपासून इंग्लंड-आॅस्ट्रेलिया अॅशेस मालिका सुरु होत आहे. त्यांचा पहिला सामना कार्डिफमध्ये खेळला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वॉट्सनने ही प्रतिक्रिया दिली. तेहत्तीस वर्षीय वॉट्सन हा विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियन संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. संघाची अपयशाची शृंखला खंडित करण्याची वॉटसनकडे ही अखेरची संधी असेल. आॅस्ट्रेलियाने २००१ नंतर इंग्लंडमध्ये अॅशेस मालिका जिंकली नाही. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क (वय ३४), यष्टीरक्षक ब्रॅड हॅॅडिन (३७), वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन (३३) हे खेळाडू अॅशेश मालिकेत प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. या विश्वविजयी संघांतील खेळाडूंच्या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज पीटर सीडल (३०), रियान हॅरिस (३५), फलंदाज क्रिस रॉजर्स (३७) हे खेळाडू देखील एकदा मिळालेल्या संधीचे सोने करू शकले नाहीत. संघातील बहुतांश खेळाडू तिशी पार आहेत.